सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडलेल्या त्या तीन शाळकरी मुलींच्या मदतीला धावली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान.
सावंतवाडी
सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव येथे जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व तोंडाला मार लागला असून त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा जिल्हारुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती रेल्वे स्टेशन येथील स्टॉल धारक रेडीज यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव तत्काळ दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे या हॉस्पिटलमध्ये लगेच पोचून गाडीमधून त्यात अपघातग्रस्त तिन्ही मुलींना उतरून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टर चौगुले यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या दोन्ही मुलींच्या डोक्याचं सिटीस्कॅन करून त्या दोन मुलींना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले त्यातील दोन मुलींची प्रकृती स्थिर आहे तर दुसरी मुलगी अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे.
सदर मुली मळगाव हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी कणकवली वरून सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना ही दुर्घटना घडली या घटनेची त्यांच्या प्रशिक्षकांना माहिती मिळतातच त्यांचे प्रशिक्षक प्रताप परब, वसंत तावडे यांनी सदर मुलींना आपल्या गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर मुलीचे प्रशिक्षण व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करून रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे आभार मानले.