*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बाईपण*
बाईचं बाईपण कुणालाही कळतं नसतं
बाई समजून घेणं खरचं अवघड असतं
वेदनांचीच माळ गळ्यात पडते तिच्या
सप्तपदीचे ते वचन का खोटे असतं
घर सांभाळून ही मन तिनेच सांभाळायचं
फेरे सात घेऊन ही खरचं का प्रेम असतं
आरक्षण देऊन ही ती कुठे हुशार झाली
ती सत्तेत येऊ ही खुर्चीवर दुसरच असतं
स्त्री स्वातंत्र्य झाली आहे म्हणे आज लाडक्या बहिणीच्या रक्षणाला
सांगा बरं कोण असतं
घर आणि घरपणात स्वतःकडे कधीच लक्ष नसतं
अन्यायावर कुणाच का नियंत्रण असतं
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७