You are currently viewing महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा संकल्प

*शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत झाल्या बैठका

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असा नितेश राणे यांचा विजय होण्यासाठी शिवसेना सरसावली

कणकवली
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना ७० हजार चे मताधिक्य मिळवून विजयी करण्यासाठी काम करणार असा संकल्प शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला. कणकवली,वैभववाडी,देवगड येथे प्रत्येक तालुक्यात बैठका जाऊन शिवसेनेच्या कामाचा आढावा जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी घेतला.
कांदळगावकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून युतीचे काम एक दिलाने करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेला विजय येथे मिळवून द्या. महायुतीचे उमेदवार श्री.नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार करूया असे आवाहन केले.अश्याच प्रकारे वैभववाडी व देवगड येथे कार्यकर्त्याच्या समस्या समजून घेवून युतीचे काम करून श्री.नितेश राणे यांना विधानसभेत ७० हजार चे लीड देण्याचा सर्वांनी निर्धार केला.यावेळी देवगड येथे विभाग प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत,महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मेहुल धुमाळे महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत,कणकवली तालुका प्रमुख प्रिया टेंबकर,कणकवली तालुका प्रमुख श्री.शरद वायंगणकर,उप तालुका प्रमुख श्री. दामू सावंत,सुनील सावंत, मंगेश गुरव,जिल्हा प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी,देवगड तालुका प्रमुख निता गुरव,स्वप्नाली वाल्मिकी,वैभववाडी उप जिल्हा प्रमुख व महिला तालुका प्रमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा