You are currently viewing सौ. अर्चना घारे- परब..

सौ. अर्चना घारे- परब..

सौ. अर्चना घारे- परब..
माझ्या माहेरी किंवा सासरीही कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, किंवा तोंडात सोन्याचा चमचापण घेऊन जन्माला आली नाही. माहेरचीही जेमतेम परिस्थिती. मात्र लग्न होवून पुण्याला गेल्यावर माझ्या सुदैवाने या देशातील अष्टपैलू जेष्ठ नेते आदरणीय पवार साहेब व कुटबियानी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्याच प्रेरणेने व आशिर्वादाने मी नकळत राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झाले. अर्थात घरच्या सगळ्याच मंडळींनी यासाठी मला उत्तम साथ दिली आणि देत आहेत.
मा. पवार साहेबांचे आशिर्वाद व मार्गदर्शन घेऊन आठ वर्षापूर्वी मी तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानची उज्वल व देदीप्यमान परंपरा असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात सामाजिक जाणिवेतून काम करू लागले. पवार साहेबांना मानणारा पूर्वीच्या पिढीतील वर्ग आहे पण वयोमानानुसार आणि बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार ते काही जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय नसले तरी आजही मोठ्या साहेबां बद्दल आदराने व्यक्त होतात. अशा जेष्ठांचेही आशिर्वाद घेऊन पक्ष संघटना बांधण्याचे काम सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यात केल.
२०१९ च्या निवडणुकीत ती माझी सुरुवात होती. माझं शालेय व माध्यमिक शिक्षण याच सावंतवाडीत झाल्याने या मतदारसंघातील ग्रामीण समस्या समजून घ्यायला वेळ लागला नाही. २०१९ मध्ये आयत्यावेळी पक्षाने एबी फाॅर्म मी इच्छुक असतानाही दुसऱ्या उमेदवाराला दिला. त्यावेळीही पक्षनिष्ठा, पक्ष शिस्त व मोठ्या साहेबांच्या प्रती असलेल्या आदर व प्रेम यामुळे तो विषय मी अतिशय संयमाने घेतला.
त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. सातत्याने पुढची पाच वर्षे पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरले. गावागावात, वाडिवाडीतून फिरत असताना गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघातील विकास किती वेडा झालेला आहे याची जाणीव पावलोपावली होत आहे. मी ठरवलं आपण परिवर्तनसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा आदर्श व विचार डोळ्यासमोर ठेवून काम करायचं.. संपूर्ण मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात बेरोजगार युवक, युवती, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्तीधारक, शेतकरी, बागायतदार, मच्छिंमार अशा विविध घटकातील लोक माझ्या या प्रामाणिक प्रयत्नांशी अगदी प्रेमाने सहजपणे जोडले गेले. पक्ष, जात, धर्म, पंथ या पलीकडे एक व्यापक मानवतावादी द्रुष्टीकोन ठेवून ही परिवर्तनाची चळवळीने व्यापक स्वरूप प्राप्त केले. लोग आते रहे, कारवा बनता रहा ही अनुभूती मी घेतली. राजकारण समाजासाठी करा स्वतःच्या स्वार्थासाठी करू नका हा विचार ज्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिला त्याचे स्मरण मी करू लागले.
मतदारसंघातील सर्वचं घटकांनी निश्चय केला की आपल्या या भूमीकन्याला एकवार संधी द्यायची. या द्रुढ निश्चयाने मी सुद्धा अहोरात्र मतदारसंघात पक्ष आणि मी स्थापन केलेल्या अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी माझ्या क्षमतेनुसार समाजपयोगी अनेक उपक्रम राबवले… आता माझ्यापेक्षा माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या जनतेची इच्छा व उत्सुकता होती की मलाच आघाडीची उमेदवारी मिळणार. कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते.. पण या मतदारसंघात अगदी शेवटच्या क्षणाला अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आणि आघाडीची उमेदवारी भलत्यालाच मिळाली. सुरूवातीला क्षणभर मी थोडी निराशेच्या गर्देत ढकलली गेली.. चांगल्या माणसानी राजकारणात येवूचं नये का ❓ असा भोळा प्रश्र्न मी स्वतःलाच विचारत होते.. पण गेल्या आठ वर्षात जो कारवा मी निर्माण केला होता.. तो मला स्वस्थ बसू देईना. माझ्या उमेदवारीसाठी मोठ्या साहेबासह सर्व जेष्ठ नेत्यांनी आटोकाट प्रयत्न माझ्या उपस्थितीत केले. पण आघाडीच्या राजकारणात मोठ्या साहेबांचाही नाईलाज झाला.
मतदारसंघात माझ्यावर निर्वाज्य प्रेम करणाऱ्या शेकडो समर्थकांनी आग्रह धरला की ताई, काय होईल ते होऊदे,अपक्ष लढायचं आणि जिंकायचं.माझ्या शेकडो माता, भगिनीना अश्रु अनावर झाले. या जिल्ह्यात समाजासाठी रचनात्मक काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आग्रह केला की लढायचचं…. या सगळ्याच्या विश्वासाची व अभूतपूर्व प्रेमाशी मी प्रतारणा करू शकत नव्हते.. आणि मी निर्णय घेतला.. लडकी हूॅ, लढ सकती हूॅ!
प्रचाराच्या दरम्यान मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद, विकासाच्या नावाखाली गेली तब्बल पंधरा वर्षे लोकांची झालेली फसवणूक, स्वतःच्या स्वार्थासाठी वारंवार मतदाराना गृहीत धरून केलेली पक्षांतर याबाबत असलेली प्रचंड चीड मतदारांमध्ये आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सावंतवाडी या सुसंस्कृत मतदारसंघात मतदार परिवर्तन करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. यापुढील काळातही निरंतरपणे ही तुमची भूमीकन्या मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी सदैव कटीबद्ध आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/151709/

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात 
————————————————
*संवाद मीडिया*

*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा