You are currently viewing आमची दिवाळी!!!

आमची दिवाळी!!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आमची दिवाळी!!!*

आमची अशी दिवाळी होती
खूप खूप सुंदर होती
भल्या पहाटे चारलाच उठायची हौस होती
अशी आमची दिवाळी होती ।।
अंगणात रांगोळ्या काढायच्या असायच्या
धडा धडा बंब पेटत असायचा
आंघोळीचाही आनंद खूप लुटायचा
दिवाळीसाठी सुगंधी साबण असायचा
वर्षातून एकदा तेलाचा सुगंध दरवळायचा
त्याचा आनंद खूप असायचा
त्यावेळी फटाक्यांची लय लूट नसायची
माणसांनी घरे गजबजलेली असायची
दिवाळीसाठी खास नवे कपडे नसायचे
वर्षातून एकदा आणलेले कपडे
सगळ्या सणांना पुरायचे
त्यातला आनंद औरच असायचा
दिवाळीचा आनंद खूप लुटायचा
आमची अशी दिवाळी असायची ।।
घरात फराळ करण्याची गडबड असायची
चिल्लर मंडळी आसपास लुडबुड करायची (पान२वर)
पान(१)वरून
चिवडा,चकल्यांचा नमुना बघायची
लाडू,करंजांची चव बघायची
सगळीकडे आनंदाची कारंजी उडायची
ती दिवाळी खूप मौजेची असायची
आमची दिवाळी अशी असायची
भरपूर पणत्यांची सिध्दता करायची
आकाशकंदिल रात्री गप्पा मारत बनवायचा।।।
पहाटे उठून आंघोळी करायच्या
नटून जायचं दर्शनाला देवाच्या
परतण्याची मात्र घाई असायची कारण ~~
कारण फराळाची आस मनी असायची
ताटे भर भरून फराळ समोर यायचा
लाडू, करंज्या, अनारसे सगळी
ताटात एकत्र नांदायची
चिवडा, चकल्या, शेवेची मैफल जमलेली असायची
पेैज लाऊन फराळावर ताव मारायचा
दिवाळीचा आनंद लई भारी असायचा
अशी आमची दिवाळी असायची

दिवाळीसाठी खास खरेदी नसायची
पाहुणा_रावळा यायची वाट पहायची
त्याचा मात्र आनंद खूप व्हायचा
डबे भरून फराळ वाटला जायचा
मित्रमैत्रिणींचा राबता असायचा
सर्वांना भरभरून फराळ द्यायचा
प्रेमाने तो खाल्लाही जायचा
संध्याकाळी दारासमोर पुन्हा सडा घालायचा
नवनवीन ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायच्या
रंग भरताना मनात आनंद भरायचा
सर्वांच्या दारातील रांगोळ्या बघायच्या
चांगल्या रांगोळ्या दाद देऊन जायच्या
असाही दिवाळीचा आनंद असायचा
बघताबघता संध्याकाळ सरायची
पणत्यांनी परीसर उजळून निघायचा
आमचा चेहरा त्यातच उजळायचा
दिवाळीचा आनंद काही औरच असायचा
आजही ती दिवाळी आठवते
तो आनंद मी शोधत रहाते
आताही नेमानं दिवाळी येते
नव्या कपड्यांची रेलचेल असते
नवीन वस्तुंची उधळण होते
पण सर्वांनी मिळून
देवाला जायची ओढ नसते
फराळाची कुणाला आवड नसते
फटाक्यांनी ध्वनी प्रदूषण होतच असते
मला आजही तीदिवाळी आठवते
तिलाच मी आपली शोधत रहाते
त्या दिवाळीला मी शोधत रहाते

विद्या रानडे, मुंबई

______________________________
*संवाद मिडिया*

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
*सण होणार मस्त.. किंमती आहेत जबरदस्त*
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
https://sanwadmedia.com/151183/

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*टाटा मोटर्स- फेस्टिव ऑफ़ कार्स*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

त्वरा करा…!!!
प्रीमियम आणि सर्वात सुरक्षित एसयूव्हि खास कमी केलेल्या किंमती मध्ये मिळणेची संधी केवळ ३१ ऑक्टोबर पर्यंत

मॅाडेल नविन एक्स शोरूम
*Harrier* 1️⃣4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Safari* 1️⃣5️⃣4️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣

खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*

*५ स्टार ग्लोबल एनकॅप आणि भारत एनकॅप ने प्रमाणित*

टेस्ट ड्राईव्ह , डेमो , एक्सचेंज , तुमच्या जुन्या कार चे फ्री इवैल्यूएशन आणि अधिक माहीती करीता कॅाल करा.

भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार घेण्याची योग्य वेळ म्हणजे भारतीय सण
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*सर्व ऑफर्स १५ नोव्हेंबर पर्यंत वैध*

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा