अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब
वेंगुर्ला :
अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथून प्रचाराची सुरुवात केली. सकाळ पासून रेडी गावापासून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली. यावेळी सौ.अर्चना घारे परब ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या.
लडकी हूं, लड सकती हूं…! मी जनतेची सेवक आहे. त्यामुळे मी निवडून येणार हे निश्चीत आहे. विजयानंतर सर्वप्रथम आरोग्याच्या बाबतीत गरजेचे असलेले हॉस्पिटल या ठिकाणी केले जाईल. वेंगुर्ला तालुका हा पर्यटनदृष्टीने व्याप्त आहे. या ठिकाणचे पर्यावरण पूरक व्यवसाय वृध्दींगत व्हावे यासाठी माझा प्रयत्न असेल. म.गांधी यांचे स्मारक सत्याग्रह झाला त्या मिठागर स्थळी व्हावे हे आदरणीय शरद पवार साहेब यांचे विचार आहे. मी निवडून आल्यावर ते पूर्ण करेन असे प्रतिपादन सौ. घारे यांनी यावेळी केले. अपक्ष उमेदवार घारे यांच्या प्रचाराची वेंगुर्ला तालुक्याची सुरूवात रेडी येथून झाली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
सौ. घारे पुढे म्हणाल्या, सर्वधर्म समभाव मानणारा असा हा प्रदेश आहे. सर्व जाती धर्माच्या बांधवांना एकत्र घेऊन चालणारा समाज आहे. यामध्ये मी कोणताही दुजाभाव करणार नाही. मी सदैव तुमच्या सोबत राहून काम करेन. माझं पुढील आयुष्य हे तुमच्या सर्वांच्या स्वप्नांसाठी तुमच्या सेवेसाठी व्यतीत करेन. मतदान करताना तुमच्या मुलांच्या डोळ्यात बघा त्यांच्या स्वप्नाकडे बघा आणि माझ्या पाकीट या चिन्हा समोरील ३ नंबरचे बटन दाबून विजयी करा असे आवाहन सौ. घारे यांनी केले.
तसेच विधानसभेचे माझे तिकीट नक्की होते. मला कोणतीही चिंता नव्हती. परंतु, अशावेळी अचानक प्रवेश करून घेऊन तिकीट दुसऱ्या एका व्यक्तीला दिले गेले आणि एका महिलेला नाकारले गेले याचे वाईट वाटले. परंतु, तुमच्या सारख्या जनतेच माय माऊलीचे, भावंडांची सोबत हीच मला मोठी बळ देणारी आहे. आज मी महिलांची प्रतिनिधी, तुमची प्रतिनिधी, सर्वसामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवडणुकीसाठी मैदानात उतरली आहे. आता जबाबदारी तुम्ही जनतेने घ्यावी आणि मला निवडून द्यावे असे आवाहन सौ अर्चना घारे-परब यांनी केले.
यावेळी रेडी , शिरोडा , आरवली , आसोली , मोचेमाड , उभादांडा येथील सर्व ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री.योगेश कुबल , दीपिका राणे , विक्रांत कांबळी , विशाल बागायतकर , सुहास मोचेमाडकर , आदिती चुडजी , कुणाल बिडीये , वनिता मांजरेकर , रिया धुरी , गजानन नारासूले , तेजस तांडेल , आबा गवंडे , शुभम नाईक , प्रशांत वेंगुर्लेकर , सुनिता भाईप , प्रशांत बागायतकर, विनायक परब , मयुरी भाईप , अलीशा गोठसकर , विवेक गवस आदी उपस्थित होते.