महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया – अबिद नाईक
कुडाळ :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पावशी येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ व मालवण तालुका कार्यकारणी सभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर, राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर यांनी ही सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करताना उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल व प्रत्येकाची कामे केली जातील. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने काम करा. महायुतीचा धर्म सर्वांनी जपा. तालुकाध्यक्ष आर. के. सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, येणार्या सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला उमेदवारी दिली गेली पाहिजे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर यांनी मनोगत व्यक्त करताना शेती उद्योगधंदे रोजगार यावर आपण लक्ष् केंद्रित केले पाहिजे. राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर यांनी बोलताना सांगितले की, मालवण तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार. राष्ट्रवादी कुडाळ विधानसभा मतदारसंघ महायुती समन्वयक एम. के. गावडे यांनी बोलताना सांगितले की, आंबा, काजू, मच्छिमार या लोकांच्या बाबतीत मदत झाली पाहिजे. जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे यांनी बोलताना सांगितले की कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या प्रामुख्याने सोडविल्या गेल्या पाहिजेत. राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर् यांनी प्रास्ताविक केले.
त्यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक राष्ट्रवादी कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावळाराम अणावकर, ओबीसी जिल्हाप्रमुख सर्वेश पावसकर, उपतालुकाप्रमुख विराज बांदेकर, युवक तालुकाध्यक्ष प्रथमेश माने, कुडाळ शहराध्यक्ष अमर ठक्कर, राज ठक्कर, प्रकाश राजपूत, राजवीर तेली, राजू दळवी, सचिन पावसकर, बाळा कुडाळकर, ओम रावळ, पिंट्या पावसकर, विजयानंद चौधरी, स्वप्निल दळवी, मंदार गोसावी, रोहित गोसावी दीपक सावळ, नंदराज पावसकर, गोपाळ तेली, तृप्ती तेली, प्रल्हाद नाबर, प्रथमेश सारंग, प्रथमेश पावसकर, दिपराज नाईक, तालुका सरचिटणीस संतोष सावंत, रवींद्र महाडगूत गंगाराम महाडगूत, गुरुजी अपा भितये, उमेश पेंधुरकर, दत्ता धुरी, किरन सावंत,प्रसाद साटम, विलास खोचरे, दयाजी कदम, भाऊ निकम, खरेदीविक्री संघांचे माजी सदस्य अशोक पालव, अमोल सावंत, राजन चव्हाण आदी उपस्थित होते.