You are currently viewing अनुपमा जाधव यांना, राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२४ प्राप्त

अनुपमा जाधव यांना, राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२४ प्राप्त

 

डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, जेष्ठ साहित्यिका, निवेदिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी मा.अनुपमा जाधव यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव, संस्थापक अध्यक्षा सौ.संदिपा ज्ञानेश्वर वाघ यांच्या तर्फे बहाल करण्यात आला.

अनुपमा जाधव यांनी मराठी, हिंदी, अहिराणी अशा भाषेतून विविध लेखन केले आहे. तसेच समुद्रसंगीत, वहिवाट,रानझरा, अनुबंध ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तसेच स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत या गाण्यांची देखील त्यांनी निर्मिती केली आहे. पथनाट्य लेखन, चारोळ्या लेखन,सण उत्सव यावर त्यांचे विशेष लेख प्रकाशित झाले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना कविता फुलते कशी! कथाकथन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य लेखन व सादरीकरण यांचे मार्गदर्शन करत असतात.तसेच राष्ट्रीय हरित सेनेच्या मार्फत त्या विविध उपक्रम राबवित असतात.

एक विद्यार्थी एक झाड,झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, कंपोस्ट खत निर्मिती, परसबाग, असे उपक्रम त्या राबवित आहेत.

स्वच्छता अभियान प्रबोधन स्वच्छ गाव, समुद्र स्वच्छता, वन्यजीव संरक्षण,मतदार जनजागृती, घोषवाक्ये.शिक्षणाचे महत्त्व, स्वावलंबी जीवन, वेळेचे महत्त्व. अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मुलां फुलांवर देखील त्या जीवापाड प्रेम करतात, म्हणून त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत.

अनुपमा जाधव यांचे परीसरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा