कुणकेरी कला, क्रीडा मंडळातर्फे निमंत्रित मंडळांची भजन स्पर्धेचे ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन
सावंतवाडी
कुणकेरी येथील क्रीडा आणि कला विकास मंडळाच्यावतीने कुणकेरी, आंबेगाव व कोलगाव मर्यादित निमंत्रित भजन स्पर्धेचे ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता कुणकेरी येथील श्री देवी भावई मंदिरात होणार आहे. भजन स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता माणिक चौक प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी बुवा कु. प्रथमेश मडवळ, रात्री ७.४५ वाजता श्री सिद्धिविनायक भजन मंडळ कुणकेरी, बुवा शंकर सावंत, रात्री ८.३० वाजता श्री दिबर्बादेवी प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा गुरु सावंत, रात्री ९.१५ श्री देव उपरलकर प्रासादिक भजन मंडळ कुणकेरी बुवा कु. रौनक मोघे, १०
नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा सुहास राऊळ, सायंकाळी ७.१५ वाजता गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ, आंबेगाव बुवा रुपेश तेली, रात्री ८ वाजता श्री देव लिंगक्षेत्रपाल प्रासादिक भजन मंडळ आंबेगाव, बुवा सीताराम परब, रात्री ८.४५ वाजता श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, कोलगाव बुवा कु. जान्हवी राऊळ, रात्री ९.३० वाजता श्री जय शंभो प्रासादिक भजन मंडळ, कुणकेरी बुवा प्रसाद सावंत. भजन रसिकांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा आणि कला विकास मंडळाचे अध्यक्ष भरत सावंत आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.