बावशी शाखाप्रमुखपदी दीपक कांडर यांची नियुक्ती
कणकवली :
तोंडवली-बावशी येथे मविआ उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ गाव बैठक संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. तोंडवली-बावशी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना विजयी करूया असे आवाहन यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. बावशी शाखाप्रमुख पदी दीपक कांडर यांची निवड यावेळी सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, मज्जीद बटवाले, तात्या निकम, अतुल सदडेकर, इमान नावळेकर, आबू मेस्त्री, हेमंत कांडर, दीपक कांडर आदी शिवसैनिक व महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.