You are currently viewing महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणुया…

महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणुया…

महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणुया…

वेंगुर्ले येथे भाजपा युवामोर्चा आढावा बैठकित एकमुखी ठराव..

वेंगुर्ले

विधानसभेच्या अनुषंगाने महायुती प्रचार यंत्रणा, तशीच कार्यकर्ता रचनात्मक कार्यकारणी आणि जबाबदारी याची विस्तृत चर्चा वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयात युवामोर्चा आढावा बैठकित करण्यात आली. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महायुतीचे उमेदवार श्री.दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला.

 

 

या बैठकीत निवडणूक प्रचाराचे नियोजन पंचायत समिती भागात बैठका, खळा बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी महायुती साठी कशाप्रकारे काम करायचे याचे विस्तृत मार्गदर्शन युवा मोर्चा कार्यकर्त्यांना केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री.हेमंत गावडे यांनी मोठ्या मताधिक्याने आपले महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर निवडून आले पाहिजे त्यासाठी सर्वानी तळागाळात जाऊन काम करूया. आणि दिपकभाईना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणूया असे सांगितले. तसेच वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर यांनी कोणीही कितीही प्रयत्न केले तरी आपले महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत तरी युवा मोर्चाने आपले दहा दिवस जास्तीत जास्त तळागाळात आपल्या सरकारच्या योजना काम पोहचण्याचे आहे असे सांगितले. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस श्री. वैभव होडावडेकर महायुतीसाठी आपल्या पक्षाची प्रामाणिक राहून सर्वानी एकजुटीने काम करूया राज्यात पुन्हा सत्ता येण्यासाठी सर्वानी काम करूया असे सांगून सर्व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

 

 

यावेळी तालुका सरचिटणीस संकेत धुरी, तालुका उपाध्यक्ष मनोहर तांडेल, राहुल गावडे, सोमा सावंत, प्रीतम सावंत, मारुती दोडशनत्ती, संदीप पाटील, रवींद्र धोंड, अमेय धुरी, दशरथ गडेकर, संतोष सावंत,पंकज राणे,राकेश धुरी,सचिन गावडे,गणपत दाभोलकर, चंद्रकांत चव्हाण,विनीत किंनळेकर,सहदेव केरकर,संजय केणी, अमर जबडे, अनंत मठकर, जयेश राऊळ, गौरेष खानोलकर,प्रविण गडेकर,गौरेश खानोलकर, कमलेश करंगूटकर, संदीप पाटील, नितीन लिंगोजी, केतन हंजनकर आदी युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा