कोकण रेल्वे सेवानिवृत्त क्लार्क सायली आकेरकर यांचे अपघाती निधन
कुडाळ :
परिवारासोबत भाऊबीज कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकी समोर मांजर आडवे आल्याने झालेल्या अपघातात कुडाळ कवीलकाटे येथील सायली शरद आकेरकर वय 60 यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कुडाळ पंचक्रोशीत समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. शांत व सुस्वभावी असणाऱ्या सायली आकेरकर कोकण रेल्वेत कमर्शियल क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सौ सायली आकेरकर यांचे मूळ गाव कवील काटे येथे असून सध्या त्या कुडाळ माठेवाडा येथे राहत होत्या. आकेरकर कुटुंब भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्या घरी भाऊबीज कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. भाऊबीज कार्यक्रम ऑटोपून पती दोन मुले असे कुटुंबासोबत घरी दुचाकी वरून येत असताना कुडाळ बाव रस्त्यावरील कवील काटे बाळकृष्ण नगर येथे दुचाकी समोर अचानक मांजर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात मुलगी व मागे बसलेल्या सौ आकेरकर अपघातात रस्त्यावर पडल्या त्यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. तर आकेरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती पुतण्या राखोबा भरत आकेरकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलीस उपनिरीक्षक श्री पालवे, पोहेकॉ भुतेलो, मंगेश शिंगाडे, पाडगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शरद आकेरकर यांच्या त्या पत्नी होत. सौ सायली यांच्यावर सोमवारी शोकाकुल वातावरणात कवीलकाटे येथील स्मशानभूमीत जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.