You are currently viewing दक्षिण कोकणच पंढरपूर सोनुर्ली श्री माऊली देवीची लोटांगण जत्रा १६ रोजी

दक्षिण कोकणच पंढरपूर सोनुर्ली श्री माऊली देवीची लोटांगण जत्रा १६ रोजी

दक्षिण कोकणच पंढरपूर सोनुर्ली श्री माऊली देवीची लोटांगण जत्रा १६ रोजी*.

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हयात वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशी, त्रिपुरी पौर्णिमेदरम्यान सुरु होतात. यापैकी मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली येथील देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे. देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भाविक नतमस्तक होतात. आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देवीकडे लोटांगणाचा नवस केला जातो. योग्य जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवसकरी महिला उभ्याने सुलभ मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात, तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक भक्त एकच गर्दी करतात. देवीच्या मंदिरासभोवती करण्यात आलेली विद्युत रोषणाई, लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. जत्रोत्सवाला लोटणारी गर्दी पाहता, पोलीस प्रशासनाकडूनही पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. प्रतिवरशी पप्रमाणे यंदाही सर्वांनी उपस्थित रहावे अशी विनंती सोनुरली देवस्थान कमिटी व मानकरी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा