सिंधुदुर्गातील तीन विधानसभेसाठी १७ उमेदवार रिंगणात…
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभेच्या जागेसाठी आता १७ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत तर आज चौघांनी आपली माघार घेतली. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीत खरी लढत रंगणार आहे.
यात कणकवली मतदार संघातून आज अपक्ष उमेदवार प्रकाश नारकर आणि विश्वनाथ कदम यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीकडुन नितेश राणे, महाविकास आघाडीतून संदेश पारकर, बसपाकडुन चंद्रकांत जाधव आणि अपक्ष गणेश माने, बंदेनवाझ खानी आणि संदेश परकर हे रिंगणात आहेत. कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून आज दोघांनी माघार घेतली. यात अपक्ष उमेदवार स्नेहा नाईक व प्रशांत सावंत यांचा समावेश आहे तर आता ५ जण निवडणुक रिंगणात आहेत. यात महायुतीचे निलेश राणे, महाविकास आघाडीकडुन वैभव नाईक, महराष्ट्र स्वराज्य पार्टीचे अनंतराज पाटकर, बसपाचे रविंद्र कसालकर, अपक्ष म्हणून उज्वला येळावीकर यांचा समावेश आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून आज कोणीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे महायुतीतून दीपक केसरकर, महाविकास आघाडीतून राजन तेली, अपक्ष म्हणून भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब, शरद पवार राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे, अपक्ष म्हणून दत्ताराम गावकर आणि सुनिल पेडणेकर यांचा समावेश आहे.