You are currently viewing महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन

महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्या उद्घाटन

कणकवली :

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री संदेश भास्कर पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील कै.श्रीधर नाईक चौकातील सनराईज टॉवर कॉम्प्लेक्समधे करण्यात येणार आहे.

तरी या उद्घाटन सोहळ्यास कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा संपर्कप्रमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, सर्व शिवसेना तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, मागास सेल जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, अनुसूचित जाती जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते, शिवसेना, युवासेना, महिला उपजिल्हाप्रमुख, शिवसेना युवासेना महिला तालूकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना शहरप्रमुख, शिवसेना महिला युवासेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना महिला युवासेना सरचिटणीस, सर्व शिवसेना महिला युवासेना शाखाप्रमुख, सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि महविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख श्री.सतिश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा