You are currently viewing कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना दोन हजारांहून अधिक मताधिक्य देणार – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना दोन हजारांहून अधिक मताधिक्य देणार – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना दोन हजारांहून अधिक मताधिक्य देणार – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे कणकवली विधानसभेचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना कणकवली शहरातून 2 हजार च्या वरती मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येत असून यामध्ये सर्वात जास्त कणकवली मतदार संघातून आमदार नितेश राणे मताधिक्य घेऊन इतिहास रचतील अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली. कणकवली शहराचा विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलण्यात आमदार नितेश राणे यांचा मोठा वाटा आहे. कणकवली शहरात 2008 पासून आतापर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावून दिलेला शब्द आमदार नितेश राणे यांनी पूर्ण केला आहे.

कणकवलीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल याच सोबत कणकवली शहरातील अंतर्गत सर्व रस्त्यांची कामे, कणकवलीच्या पर्यटन विकासात भर टाकणारा गणपती सान्यावरील धबधबा, जानवली नदीवरील गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला पूल, कणकवली शहरातील रिंग रोड यासह अनेक कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात मार्गी लावली. कणकवलीच्या विकासाचा ध्यास घेत आमदार नितेश राणे यांनी काम केले असून त्यांना शहरातील जनते कडून मतदानाच्या रूपाने पाठिंबा देण्यात येणार असल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली.

प्रतिस्पर्धी उमेदवार कितीही आरोप करू दे किंवा कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू दे त्याला चारीमुंड्या चित करून आमदार नितेश राणेंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार कणकवली शहरवासी यांनी केला आहे. कणकवली शहरात प्रभाग निहाय आमदार नितेश राणेंची प्रचार फेरी सुरू करण्यात आली असून, शहरात प्रत्येक प्रभागांमध्ये नितेश राणे यांना पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा विजय निश्चित असला तरी कणकवली शहराचे मताधिक्य ही वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.

आमदार नितेश राणे यांनी केलेली विकास कामे हीच जनतेला अपेक्षित असून जनतेला अपेक्षित विकास आमदार राणे यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी राहत जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास श्री नलावडे यांनी व्यक्त केला. कणकवली शहरात शिवसेना ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेते राहतात. त्यामध्ये आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, परशुराम उपरकर, राजन तेली हे प्रमुख ठाकरे गटाचे पदाधिकारी कणकवली शहर व आसपास राहणारे आहेत. मग यापैकी कोणीही कणकवली शहरातील मताधिक्याबाबत आव्हान द्यावे असे देखील खुले आव्हान नलावडे यांनी दिले आहे. महाराष्ट्रभर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून आमदार नितेश राणे हे समोर आले आहेत.

भाजपा पक्षाकडून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली व त्यांनी ती पूर्णपणे पार पाडली. त्यामुळे आमदार नितेश राणे हिंदूंचा चेहरा म्हणून राज्यात समोर येत असताना कणकवली शहर देखील त्यांच्या हिंदुत्वाच्या विषयावर देखील ठाम उभे राहील याची विश्वास नलावडे यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा