गोवा राज्यांचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत भाजपाचे स्टार प्रचारक महायुतीच्या प्रचारासाठी येणार!!!!
वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर बोलणी सुरू -गणेशप्रसाद गवस
दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी (अजित पवार) व आर पी आय महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपा पक्षाचे स्टार प्रचारक गोवा राज्यांचे युवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत येणार आहे याबाबत राज्याच्या महायुतीच्या स्कोर कमिटी कडे मागणी करण्यात आली असून त्या अनुषगाने नुकतीच दोडामार्ग तालुका शिवसेना प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी गोवा येथे त्यांची भेट घेऊन जिल्ह्यात आपल्या सभा झाल्यास युतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन होऊन युतीचे उमेदवार यांना फायदा होणार आहे
यामध्ये कणकवली विधानसभा मतदासंघातील भाजपा आमदार नितेश राणे कुडाळ मधून माजी खासदार कुडाळ विधानसभा उमेदवार डॉ.निलेश राणे सावंतवाडी विधानसभा मतदासंघातील ना. दिपक केसरकर आदी तिन्हीयुतीच्या उमेदवारांना चागलं मताधिक्य मिळणार आहे व कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत त्यांनी होकार दिला असल्याचं स्पष्ट केले याबाबत राज्यांचे महायुतीचे नेते याच्याशी वरिष्ठ पदाधिकारी चर्चा करून कार्यक्रम आखला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे
गोवा राज्यांचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना मानणारा मोठा युवा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आहे राज्य नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात व त्याचा कायम सहभाग गोवा महाराष्ट्र राज्याचा उपक्रमात राहिला आहे त्यांना मानणारा मोठा युवा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आहे तसेच अनेक युवक गोव्यात नोकरी निमित्त येजा करीत असतात तसेच सीमावर्ती परिसरातील गावात भाजपाचें मोठें प्राबल्य आहे दोडामार्ग, बांदा,शिरोडा, वेंगुर्ला भागात सभा युतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना युतीच्या माध्यमातून फायदा होणार आहे त्यामुळं डॉ प्रमोद सावंत यांच्या सभा व्हाव्यात यासाठी शिवसेनेच्या वतीने भेट घेण्यात आली यावेळी युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस सह पदाधिकारी उपस्थित होते