*वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग शहराचे गतवैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध:- सौ.अर्चना घारे परब*
*यावेळी लढणार आणि जिंकणारच..वेंगुर्ला येथील दिवाळी फराळ कार्यक्रमात व्यक्त केला निर्धार*
वेंगुर्ला: सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदारसंघात चुरस वाढली असून उद्या आवेदन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच राष्ट्रवादी(श.प.) गटाच्या नेत्या आणि अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांनी वेंगुर्ला येथे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात उपस्थित राहून उपस्थितांना दिवाळी तसेच आजच्या भाऊ बहिण नात्याच्या पवित्र भाऊबीज सणानिमीत्त भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना “आता लढणार आणि जिंकणार” असा निर्धार व्यक्त केला आणि जिंकून आल्यावर सर्वप्रथम ज्याप्रमाणे वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग शहराला एक वेगळी ओळख होती ती आज कुठेतरी हरवली आहे. तेच गतवैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगून इथल्या आरोग्य सुविधा, रोजगार विषयक उणीवा आहेत त्या देखील पूर्णत्वास नेण्याचा दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू असा शब्द दिला.
कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्गातून आजच्या सत्तेतील नेत्यांनी कोणतीही विकासात्मक किंवा धोरणात्मक कामे केली नाहीत अशी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर “ताई तुम्ही या निवडणुकीत विजय होऊन आमचा महिलांचा आवाज बनून आमच्यासाठी काम करा” अशा अपेक्षा महिला वर्गातून बोलून दाखवल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघाचे नेतृत्व महिलेने केले नसल्याने सावंतवाडी मतदारसंघातील महिलांना सौ. अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून एक महिला उमेदवार मिळणार असल्याने महिला वर्गाच्या आशा पल्लवित झाल्याने दिसून येत आहे. अर्चना घारे परब यांनी गेल्या सात आठ वर्षातील या मतदारसंघातील सामाजिक कार्यातून महिला वर्गात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून महिला वर्गाला चांगले भविष्य असल्याचे स्वप्न देखील दाखविले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला सौ.अर्चना घारे परब यांच्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे. बहिण भावाचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर मतदार संघातील या लाडक्या बहिणीचे भविष्य निवडणुकीत उज्वल होते का हे येणारा काळच ठरवणार पण, नक्कीच सौ अर्चना घारे परब मतदारांच्या मनात कायम स्थान मिळवणार.
वेंगुर्ल्यातील दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन वेंगुर्ल्यातील मांजरेकर परिवाराने केल्याबद्दल सौ अर्चना घारे परब यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या समवेत योगेश कुबल, विनायक परब, विक्रांत कांबळी, सौ दीपिका राणे, सौ अदिती चुडजी, सायली पांगम, ऋतिक परब, विवेक गवस आधी पदाधिकारी उपस्थित होते.