You are currently viewing परिस्थिती हाताबाहेर, कोण थांबवणार?

परिस्थिती हाताबाहेर, कोण थांबवणार?

“परिस्थिती हाताबाहेर, कोण थांबवणार?
देशसेवेच्या,समाजसेवेच्या नावाखाली जनसेवक म्हणून मिरवणारे, काही स्वार्थी बेमुर्वत राजकारणी आपल अस्तित्व अबाधित राहावे, सरकारी संसाधने आणि लाभ आयुष्यभर मिळत रहावा म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी हात मिळवणी करून त्यांच्या युत्या,आघाड्या करतात आणि इथेचं राजकारणाचे खऱ्या अर्थाने गुन्हेगारीकरण होते. याला बिनदिक्कतपणे समर्थन देणारे असंख्य अंधभक्त, क्षणिक मोहासाठी बळी पडणारे मतदार आणि पोलीस, कोर्ट, संविधान आणि कायदा कसा धाब्यावर बसवायचा यातं माहीर असलेले आणि प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे, नेत्यांच्या आजूबाजूला आर्थिक लाभासाठी घुटमळणारे खुशमस्करे, जनतेसमोर वास्तव मांडण्याची धमक नसलेले काही मॅनेज पञकार,या सगळ्यामुळे दिवसेंदिवस राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत आहे. हा सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे.
यामुळेच सचोटीचे राजकारण आणि पारदर्शी प्रशाशन दुर्मीळ होत चालले आहे.. कितीही मखलाशी करा पण हे भेदक वास्तव आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे… हे कोण थांबवणार???
… Adv. Nakul Parsekar..

प्रतिक्रिया व्यक्त करा