मी आणलेल्या विकास कामांचे उदघाटन करण्यासाठी विरोधकांना बोलवा म्हणजे मी केलेला विकास त्यांना दिसेल :मंत्री दीपक केसरकर*
महायुतीने केली वज्रमूठ : विजय दीपक भाईंचाचं :महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन*
*दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात करोडो रुपयांची कामे मी आणली मात्र माझ्या विरोधकांना ती दिसली नाहीत, अनेक गावाना वळसा घालून जावे लागायचे तेथे जवळचे रस्ते मी केले, मात्र माझं विकासाच राजकारण त्यांना दिसलं नाही, आतां मी पुन्हा निवडून आल्यानंतर आणखी विकास कामे आणीन त्याची उदघाटन करायला माझ्या विरोधकांना बोलवा म्हणजे त्यांना मी केलेला विकास दिसेल आसा उरोधीक टोला मंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे लगावला, त्यांनी महायुतीच्या दोडामार्ग प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सत्यवान गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आर पी आय अध्यक्ष रमाकांत जाधव, जिल्हा प्रमुख अशोक दळवी,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, महिला तालुकाप्रमुख सान्वी गवस, चेतना गडेकर, भाजपा महिला आघाडी प्रमुख दिक्षा महालकर, युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, शिवसेना शहर प्रमुख योगेश महाले, भाजपा शहर प्रमुख राजेश फुलारी आदी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादि व आर पी आय चे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी बहूमताने दीपक केसरकर यांना विजयी करू असे संगितले, तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सत्यवान गवस यांनी लोकसभे पेक्षा जास्त मताधिक्य दीपक केसरकर यांना मिळेल आसा विश्वास व्यक्त केला तर आर पी आय चे रमाकांत जाधव यांनी दीपक केसरकर यांना जिंकवण्यासाठी प्रचारात आघाडी घेऊ असे म्हटले.
https://kutumbapp.page.link/tcCPHbiQqBewH2UCA
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
9765446118