*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।श्री गजानन ।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ७० वे
अध्याय -१२ वा, कविता – चौथी
___________________________
रे पितम्बरा तू ऐक जरा । सोडू नकोस तू धीरा । अससी तू शिष्य खरा । कार्य माझे करण्यास ।। १ ।।
मठास सोडुनी जातांना । वाईट वाटे त्याच्या मना । अश्रू त्याचे थांबेना । शेगाव सोडताना ।। २ ।।
पितांबर कोंडोली गावी आला । वनात तो थांबला ।
आंब्याच्या झाडाशी बसला । स्मरण करी स्वामींचे रात्रभर
।। ३ ।।
दिवस उजाडला । मुंग्या- मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला ।
मग झाडावरी जाऊनी बैसला । पितांबर ।। ४ ।।
गुराखी पाहू लागले । कौतुक त्यांना वाटले । पडत कसा नाही, आश्चर्य वाटले । त्या सगळ्यांना ।। ५ ।।
फांदी-फांदी हा फिरतो आहे । कसे यास जमते आहे ।
कोण हा विशेष आहे ? । कळत नाही ।।६ ।।
असावा हा शेगावचा । शिष्य श्री गजाननाचा । हेतू काय ?इथे येण्याचा ?। विचारू त्यास ।। ७ ।।
गावात वृत्त हे कळले । लोक तिथे आले । विचारू लागलें।
तू कोण रे ? आलास इथे कशाला ?
*********************
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.
____________________________