You are currently viewing खामगाव शहरात ‘एक दिवा स्वतःच्या ज्ञानासाठी,एक दिवा विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी’

खामगाव शहरात ‘एक दिवा स्वतःच्या ज्ञानासाठी,एक दिवा विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी’

✍️खामगाव शहरात ‘एक दिवा स्वतःच्या ज्ञानासाठी,एक दिवा विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी’
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 🎆

✍️खामगाव शहराच्या वैभवात भर घालणारी व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुसज्ज असलेली वैभवशाली वास्तु क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेचे लोकार्पण 05 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते.
खामगाव शहरात नाविन्यपूर्ण असलेल्या या अभ्यासिकेच्या व्यवस्थापनाची सुरुवात 12 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून अतिशय अल्प दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी पालक व शिक्षक इत्यादी वर्गामध्ये सदर अभ्यासकेबद्दल अत्यंत उत्स्फूर्त असा दैनंदिन वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.
खामगाव सारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी मेट्रोसिटीहून अधिक गतिशील आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्यासाठी तसेच गरीब, अभ्यासू, होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देऊन त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविण्यासाठी सदर अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय अल्प दिवसाच्या कालावधीमध्ये 1200 च्या वर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी भेटी दिल्या असून, असे निर्देशनात दिसून येत आहे की उत्तरोत्तर नोंदणी करत असलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असून आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती, सीईटी, टीईटी, बँकिंग, इत्यादी क्षेत्रात करिअर घडविणारे विद्यार्थी विद्यार्थिनी खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत.
खामगाव शहराच्या विकासात भर घालणारी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने युक्त असलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका या अभ्यासिकेच्या रचनेबाबत विद्यार्थ्यांनी स्वतः समाधान व्यक्त करत आज दिवाळीच्या पर्वावर ‘एक दिवा स्वतःच्या ज्ञानासाठी, एक दिवा विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी’ या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून सदर अभ्यासिकेच्या माध्यमातून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी या अभ्यासिकेचा त्यांना उपयोग होईल आणि त्यांचे स्वप्न पूर्तता नक्की होईल यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि अभ्यासिकेच्या केलेल्या रचनेबाबत सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी खामगाव परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा