दीपावली साहित्य विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना परतीचा पाऊस व लाईटीच्या खेळ खंडोबाचा फटका.
सावंतवाडी
गणेश उत्सव व दीपावली उत्सव हिंदू धर्मातील या दोन मोठ्या सणांवर छोटे-मोठे व्यापारी अवलंबून असतात परंतु पाऊस व सतत जात असलेल्या लाईटीचा खेळ खंडोबा व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानाचा ठरला.
गणेश उत्सवामध्ये थोडीफार निसर्गाने साथ दिली परंतु एन दीपावली सणामध्ये दीपावली साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना पावसाचा जोरदार फटका बसला त्यात मंगळवारी बाजाराच्या दिवशी गांधी चौक येथे झालेली सभा त्यामध्ये सहा तास रस्ता बंद असल्याकारणाने बाजारासाठी बाहेर गावातून आलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या वस्तू खरेदी करता आल्या नाहीत परिणाम याचाही फार मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला.
एकीकडे सिजनेबल व्यापार करणाऱ्या गोरगरीब व सुशिक्षित बेरोजगार युवा व्यापाऱ्यांना नगरपरिषदे कडून दिवाळीला अवघे चार दिवस असतानाच खूप उशिरा परमिशन देण्यात आली त्यामुळे आधीच व्यापारी नाराज होते परिणाम त्याचाही फटका व्यापाऱ्यांना बसला
या सर्व गोष्टींचा परिणाम स्थानिक व्यापाऱ्यांवर झाला असून जवळपास 50% दीपावलीचे साहित्य उदाहरणार्थ आकाश कंदील, दिवे रांगोळी, रांगोळीचे साचे, स्टिकर वगैरे साहित्य अशा महागड्या सिजनेबल वस्तूंचा खप झाला नसून प्रत्येकाच्या घरामध्ये सदर साहित्य पडून राहिल्या कारणाने व्यापाऱ्यांना खूप मोठा मनस्ताप झाला आहे. याचा विचार नगरपरिषद प्रशासन किंवा राजकीय व्यक्ती करेल का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.