*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दाराशी माझ्या!आहे तरी कोण?*
आजही दाराशी माझ्या
ओळखींच्या पावलांचा नाद
दारावरचा देव हसला
कुणाची तुला साद…..!
स्वप्न होते आयुष्याचे
तेही दाराबाहेर थांबलं
प्रारब्धाच्या रित्या ओंजळीत
प्राक्तनाच्या कडीत अडकलं.!
दारी निरांजन ओवळण्यास
मेणे माझ्यासाठी रेंगाळले
काळोखसाखळ्या दारांनी बांधल्या
अवसेच्या बाहुलीला लटकवले…!
जिव्हाळ्याने दारही झुकले
झाली दिवेलागणीची वेळ
उभी डोळ्यांत दिवाळी
दाराबाहेर भविष्य तेजाळ…!
सांज वेल्हाळ सुखांचा
सलोखा माझ्या दाराशी
डोळ्यांना आसवांचे हसू
कोण माझ्या दारापाशी????
थांबली होती दिवाळी…!!
दाराबाहेर!वाट पाहत होती दिवाळी
बाबा ठाकूर