You are currently viewing कणकवलीत आरबी बेकर्स भीषण आगीत भस्मसात  

कणकवलीत आरबी बेकर्स भीषण आगीत भस्मसात  

कणकवलीत आरबी बेकर्स भीषण आगीत भस्मसात

कणकवली

कणकवलीत आरबी बेकर्स सह मेडिकल स्टोअर रात्री लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झाले.

कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खाजगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले.

शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एमआयडीसी येथे अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते.

रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना ही आग दिसून आली. त्यांनी तातडीने बेकरीच्या मागे असलेल्या राजू, गौरव गवाणकर यांना उठवून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग अधिकच भडकत गेली. त्यात वीज गेल्याने आणखी समस्या येत होती. शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण नगरपालिकेची अग्निशमन गाडी ही दाखल झाली होती.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा