You are currently viewing राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने जनतेला भेटता आलं नाही: दीपक केसरकर

राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने जनतेला भेटता आलं नाही: दीपक केसरकर

*राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने जनतेला भेटता आलं नाही: दीपक केसरकर*

*मळगाव,तळवडे बाजारपेठेत केसरकरांनी साधला जनतेशी संवाद*

सावंतवाडी

नाम.दीपक केसरकर यांच्याकडे राज्याचे शिक्षण तथा मराठी भाषा मंत्रिपद आल्यानंतर महायुती सरकारमधील राज्यभरातील महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी त्यांना वेळ देता आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा संपर्क काहीसा दुरावला. नाम.दीपक केसरकर म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटेल तिथे भेटणारे, गोरगरीब, श्रीमंत कुणीही असो स्वतः त्यांना हाक मारणारे अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्याने त्यांनी प्रचार सुरू केला असून मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
दीपक केसरकर म्हणजे धार्मिक वृत्तीचे नेते. शिर्डीचे श्री साईबाबा आणि श्री दत्तगुरूंवर त्यांची अपार श्रद्धा. माजगाव येथील दत्त मंदिर मध्ये श्रीदत्तगुरुचे दर्शन घेऊन गुरुवारी सकाळी त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी मळगाव बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, रिक्षावाले, शालेय विद्यार्थी, आदी सर्वसामान्य जनतेशी त्यांनी हसतमुखाने संवाद साधला. कित्येकांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत केले. मळगाव बाजारपेठेतील सिंधुदुर्ग बँक परिसरातील छोटेखानी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी प्रेमाने दीपक केसरकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि सर्वांनी दीपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने आपल्याला जनतेशी संवाद साधता आला नाही त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे यापुढे आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, आपल्यावर राज्याची नको तर कोकणची जबाबदारी द्या; म्हणजे आपण लोकांमध्ये राहून मंजूर झालेले विकास प्रकल्प पूर्ण करणार आहे.
दीपक केसरकर म्हणजे विकासाचे व्हिजन असलेले नेते. परंतु गेली काही वर्षे राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांना मतदार संघात सर्वसामान्य जनतेत मिसळता आले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही परंतु त्यांचा मूळ स्वभावच असा आहे की ते मंत्री असो की नसो मतदारसंघातील प्रत्येकाशी हसतमुखाने, प्रेमाने बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात. केसरकरांच्या या स्वभावामुळेच ते सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधी, लोकनेते म्हणून तीन वेळा विधानसभेत गेले, आमदार, मंत्री झाले. आणि आजही लोकांच्या प्रेमामुळे जनतेच्या विश्वासावर ते पुन्हा चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले असून जनतेचे आशीर्वाद घेत असतानाच जनतेचे भरपूर प्रेम देखील मिळत आहे. त्यामुळे केसरकर आपल्या विरोधात कोण आहे याचा ते कधीच विचार करत नाहीत तर भेटेल त्याला आपलंसं करत यशस्वी वाटचाल करतात याचीच प्रचिती आज मळगाव,तळवडे येथील प्रचार दौऱ्यात आली.

______________________________
*संवाद मिडिया*

🏮🏮🎊🏮🏮🎊🎊🏮🏮

*दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*ऑफर… ऑफर… ऑफर….*💃🏿💃🏿🏃‍♀️🏃

*🎼🎼 म्युझिक कॉर्नर 🎼🎼*

*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे डिस्प्ले शोरुम*

https://sanwadmedia.com/152212/
*२०% ते २५% डिस्काउंट*

*👉Single Door फ्रीज खरेदीवर Lunch Box फ्री…*🎁

*👉Double Door फ्रीज खरेदीवर Karaoke Speaker फ्री…*🔋

*👉32″ टिव्ही + Washing मशीन 29990/- ऑफर रेट 16,990/-*🖥️

*👉43″ स्मार्ट टिव्ही + Washing मशीन 39990/- ऑफर रेट 22,990/-*🖥️

*👉50″ स्मार्ट टिव्ही + Washing मशीन 49990/- ऑफर रेट 32,990/-*
🖥️
*भरघोस डिस्काउंड व हमखास गिफ्ट्स*🎁🎁

*_🤓पहा, हाताळा मग खरेदी करा._*

*1️⃣1 रु. भरून फायनान्स उपलब्ध*

*FINANCE AVAILABLE*
*0% बजाज फायनान्स*

*TVS फायनान्स*

*📍दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ, सावंतवाडी | मोबा. 9422597779*

*ππππππππππππππππππππππππ*

*ॲक्सेसरीज खरेदीवर मिळवा ७५% पर्यंतचा डिस्काउंट*

*स्मार्ट वॉच खरेदी करा आणि त्यासोबत मिळवा. Bluethoth नेकबँड अगदी free..free..free*⌚⌚

*Powerbank खरेदीवर Buds free..free..free*📼📼

*Bluetooth Speakar खरेदीवर Pendrive free..free..free*🔋

*📍पत्ता – विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी.*
*📲मोबा- ९४२२५९७४०६*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/152209/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा