ठाणे :
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ.राजेश मढवी फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट आपुलकीची हा कार्यक्रम ठाण्यातील राम मारुती पथावर आयोजित करण्यात आला होता. या दिवाळी पहाट कार्यक्रमात दिव्यांग बाळ गोपाळांनी आपापल्यापरीने सुंदर कलात्मक अविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यात नृत्य, गायन व इतर कलांचा समावेश होता. या दिव्यांग सन्मान कार्यक्रमात मा. आमदार संजय केळकर, मा. आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष मा. जयेंद्र कोळी व इतर भाजपा कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर राजेंद्र शहा ,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार राजेंद्र गोसावी, पत्रकार, संपादक निशिकांत महांकाल सुरेंद्र हिर्लेकर अनिल चौधरी हे ही उपस्थित होते.
ठाणे शहरात सर्वत्र दिवाळी पहाट हे कार्यक्रम दरवर्षी होत असतात. रस्त्यावर सादर केलेले सर्व दिवाळी पहाट कार्यक्रम उत्कृष्ट असतात असे होत नाही. दिवाळी पहाटेला भावगीत, भक्तीगीत सांस्कृतिक गीत सादर करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. या परंपरेला गालबोट लावून दिवाळीच्या रंगाला भंग करणारी गाणी सभोवताली रस्त्यावर होत असताना. दिव्यांग बाळगोपाळांचा कार्यक्रम ठाण्यात मढवी साहेब घेत असतात. या गोष्टीचे स्वागत समाजाने करायला हवे, तरच दिव्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आपल्याला आणता येईल.
या कार्यक्रमाची सांगता ठाण्यातील दिव्यांग साहित्य, पत्रकार रुपेश पवार यांनी केली. त्यांनी दिव्यांग बाळ गोपाळाना व त्यांच्या पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यात ते म्हणाले, दिव्यांग मुलांनी अशा प्रकारे आपले कलाविष्कार सादर केले पाहिजेत. यामुळे दिव्यांग मुलांच्या जीवनात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. आम्ही देखील कालाविष्कार सादर करू शकतो, विचार देऊ शकतो असा आत्मविश्वास प्रत्येक दिव्यांग कलाकारत निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पालकांनी या मुलांना प्रोत्साहन दिले आहे. पुढे अशाच प्रकारे प्रोत्साहन त्यांना दिले जावे. असे पवार यांनी सांगितले. रुपेश पवार यांनी सुद्धा दिव्यांगत्वावर मात करून. उच्च शिक्षण घेत. बी ए एल एल बी, पत्रकारिता, ग्रंथालय शास्त्र अशा पदव्या मिळवल्या आहेत. हे करताना त्यांनी आपल साहित्यिक ठसा जनमानसाच्या मनात उमटवला आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काकुळते सरांनी केले.