*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित श्री गजानन विजय सारांश*
*श्री गजानन विजय सारांश: प्रार्थना*
१० *****
स्वामी थाटामाटाने पूजिला|
त्या नंतर तो सांगे बच्चुलाला |
भीमातटी आहे जगजेठी |
नको आटाआटी वैभवासाठी ||१||
पुरेल तव हेतू मनीचा |
परंतु मी नव्हे पशु सणासुदीचा |
नको स्पर्श दागदागिन्यांचा |
फेकून गेला, थांग न लागे त्यांचा ||२||
पितांबरासी दिला पितांबर |
धाडिले दूर कोंडोलीस |
निवांत जागेसाठी चढला वृक्षावर |
फिरला लहान सान फांदीस ||३||
गजानन जर तुझे गुरुवर |
लोक म्हणती दाव प्रत्यंतर |
हिरवागार केला तरुवर |
करुनी सद्गुरुचा नामगजर ||४||
भाव मनी जागला |
गाव कोंडोली भजनी लागला |
मठही त्यांचा तेथेची झाला |
मठात ‘ जीव ‘ उबला ||५||
जावे वाटे अन्यस्थला |
नाव कोणाचे नको त्याला |
प्रभाव समर्थांचा, हेतु पुरला |
ठराव १ एकराचा नमूद झाला ||६||
********************************
११ *****
जेव्हा बाळापूरी भास्कराला |
श्वान विषापासून वाचविला |
जन्म-मृत्युचा फेरा चुकविला |
समर्थ स्मारकाचा पाया रोविला ||१||
पर्व हनुमान जयंतीचे |
अडगावी भास्करा ताडिले |
बाळास मार दिल्याचे |
क्रियमाण नासले ||२||
पंचमीस माध्यान्ही |
भास्कर गेला वैकुंठी |
विधीवत् दिली समाधी |
द्वारकेश्वरापाशी वृक्षांसन्निधी ||३||
अन्नदान १०दिवस चालले |
कावळ्यांच्या त्रासे लोक त्रासले |
तीरकमठे तयार झाले |
तई गजानन बोलले ||४||
कावळे अन्नावर घेती उडी |
कां की नाही झाली सपिंडी |
पक्षी संत आज्ञेत वागले |
गजानन माघारी फिरले ||५||
सुरुंग विहिरीचे पेटता |
गणू मजूराच्या हाकेस धावला |
त्याने देऊन हाता |
कपारीत बसविला ||६||
गजानन कृपेचे |
महिमान थोर साचे |
साकल्ये वर्णण्याचे |
सामर्थ्य न आमचे ||७||
*****************************
****** १२*****
गणेश अप्पा चंद्राबाईंनी|
संसार अर्पिला गुरुचरणी |
संतप्रेमी आत्माराम व किती
भरली होती उमरावती ||१||
करती संतपूजा,पूजेस हजर |
बाळाभाऊ तारमास्तर |
आतानवीन मठाभितरी |
राहू लागले गजानन श्रीहरी ||२||
त्रस्त बहु एक गौमाता |
साखळीस आणी लघुता |
नंदिनीस म्हणे ब्रह्मवेत्ता |
सुखे रहा मठासी आता ||३||
लक्ष्मणास पोटशूळ उठला |
प्रसाद आंब्याचा खाल्ला |
कुपथ्य ठरले पथ्य |
कळले कां काही तथ्य ||४||
सुटला नाही दांभिकपणा |
देतो म्हणे सारी संपत्तीची दक्षिणा |
पण उभा खजिना रक्षणा |
न खपे परमार्थी खोटेपणा ||५||
********************************
१३ *****
सत्पुरुषाचा हेतू |
देव पुरवी खचित |
भाविक वर्गणी देती मठाप्रत |
हात आखडती कुत्सित ||१||
‘ गजानन भक्त ‘ समजावती |
वैभवाची इच्छा मानवाप्रती |
जन्म-मरण कैसे सुटती ?|
पुण्य-संचय करा द्रुतगती ||२||
संत सेवे समान |
कोणते नाही पुण्य आन |
स्वामी सांप्रत गजानन |
मुकुटमणी संत जाण ||३||
महारोगी गंगाभारती |
स्वामींचा थुंका अंगावरती |
चोळी, वेडा नव्हता इतुक् ही |
बरा होता, सोडी संसार मोहही ||४||
भारी वारा, पर्जन्याचा मारा |
वारी पुण्यराशी, पाहून क्षणभरा |
झाला झ्यामसिंगाचा भंडारा |
सोडला धनभार सारा ||५||
पुंडलिकाचा वारीचा करार |
उठली प्लेगाची गाठ |
मनास सांगे मनाचा निर्धार |
उठत बसत शेगाव गाठ ||६||
**************************************
१४ *****
जन सुखाचे सोबती |
निर्वाणीचा तो श्रीपती |
खर्ची पडली धनसंपत्ती |
राख फासली टाळण्या विपत्ती ||१||
मदतीसमहासंत प्रांतात |
परावृत्त केले विप्र रुपात |
सापडले धन भूगर्भात |
असा( मेहेकरच्या ) बंडूतात्याचा वृत्तांत||२||
भक्ती ती वाढली |
लीन गजानन पदा |
पुण्यकर्म वाढली |
दीनाधार सर्वदा ||३||
ओंकारकोळ्याची कन्या नर्मदा |
हात लावी नावेच्या छिद्रा |
नमस्कार केला गजानना |
वाचवाले पाचही जणांना ||४||
भोजन समयी सदाशिवास |
पाहून स्मरले त्यांच्या गुरुस |
पाठविला विडा भेट |
योगायांची दिव्य स्मरण भेट ||५||
**************************** १५ *****
हा अध्याय शावजयंतीचा |
खास अकोली गावाचा |
‘ लोकमान्य ‘ अध्यक्ष त्याचा |
आशीर्वाद गुरुरायांचा ||१||
केसरी महाराष्ट्राचा |
बोले राष्ट्रप्रेम वाढवा |
ज्ञानहीरा वर्हाडीचा |
बोले माळेल वा ह वा ||२||
प्रसंग बेडीचा येता सुधारका |
भाकरी प्रसाद मिळे टिळका |
गीताशास्त्रावरील टीका |
जन्मला ‘ गीतारहस्य ‘ ग्रंथ नीका ||३||
श्रीधर काळ्याचा |
मनोदय परदेशाचा |
यंत्रविद्या शिकण्याचा |
ताळ न लागे द्रव्याचा || ४||
ऐकली समर्थ किर्ती |
आली प्रत्यक्ष प्रचिती |
परिवर्तन विचारांचे घडले |
अध्यात्मविद्येस सेविले ||५||
*********************************
१६ *****
दंभाच्या बाजारी नसे ताळतंत्र |
सांगे समर्थ, भक्त पुंडलिका |
स्वप्नी दिला कानमंत्र |
नि नित्य पूजेसाठी पादुका ||१||
अंत समयी जो म्हणे देवा पाव |
त्यासाठीही तो घेई धाव |
भक्ता आडमार्गी करी मज्जाव |
उपास्यापदी असता स्थिरभाव ||२||
कवर निघाला गुरुसेवेला |
घेऊन भाजी-भाकरीला |
गाडी चुकली, पाणी लोचनाला |
योगाराणा हाकेत गुंतला ||३||
गुरुभक्त उपोषित |
चतुर्थ प्रहरा पर्यंत |
दिली हर्षभरे शादोरी |
झाले पारणे सत्वरी ||४||
करी सर्वदा चिंतन |
दिव्य पदाचे दर्शन |
ऐसा नित्यक्रम कैकांचा |
एक त्यात तुकाराम साचा ||५||
शिकार्याचा नेम कसा |
मेला ससा, पण न जाणे कैसा |
एकछरा ठरला घातकी |
शिरला मस्तकी ||६||
( गुरुसेवेत )परमार्थी मन रमविले |
डाॅक्टर, वैद्यास जे न जमले |
ते अवचित घडले |
१४ वर्षांनी दु:ख सरले ||७||
********************************
विजया केळकर, नागपूर