*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’दीपावली-दीपोत्सव’*
कसा ऋतू हा गुलाबी
आला हिवाळी हिवाळी…
सवे घेऊनिया आला
सण दिवाळी दिवाळी… // १ //
सडा शिंपडूनी दारी
माय काढते रांगोळी…
बाळ-गोपाळ वाजवी
फटाके नि फुलझडी… // २ //
कशी सजली राऊळे
रोषणाई सर्वदूर…
चर्यी हरेक जनाच्या
आला उजळूनी नूर… // ३ //
ताला सुरात राऊळी
वाजे मृदंग नि टाळा…
घरोघरी दारोदारी
झगमगे दीपमाळा…// ४ //
‘दीपावली-दीपोत्सव’
आला घेऊनी उल्हास…
कसा भरतोया जनी
नवचैतन्याची रास… //५//
✍️शशांक दिनकरराव देशमुख ©®
चांदुरबाजार, जि. अमरावती
(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४
मो. क्र. ९९२३५३६३२५