You are currently viewing एक काळ असा होता

एक काळ असा होता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम करणारे रचना*

 

*एक काळ असा होता*

 

सुटीत गावाकडे खेड्यात

बैलगाडीत जायचे बसून

हिरवी आमराई शेती बघत

मन जायचं हरखून….

 

वळणाचे रस्ते अन्

पक्षी आकाशात थव्याने

संध्याकाळी पायवाट

धूसर होई गोधुळीने…

 

आजी आजोबा वडीलधारी

गोष्टी रंगात असायच्या

कंदीलाच्या मंद उजेडात

सायंकाळी रंगायच्या…

 

एकमेकांच्या ओढीने

भेटत जीवाभावाने

सुखदु:खाच्या गुजगोष्टी

सांगायचे आपलेपणाने…

 

पैसा बक्कळ नसला तरी

खाऊन पिऊन सुखी घर

धावून जाती मदतीला

एकमेकांचा करती आदर….

 

भौतिक प्रगती भरपूर

विचार झाले संकुचित

आपापल्या विश्वामधे

रमले सारेच निश्चित…..

 

झाले बंगले खूप मोठे

मनं मात्र खूप कोती

प्रेम जिव्हाळा विसरत

तोडली सारी नातीगोती….

 

मिळून उन्हाळा दिवाळी

सारे जाताहेत विसरून

पर्यटन भटकंतीला

जातात आता निघून…

 

दूर जग जिव्हाळ्याचे

आभासी दुनिया जवळ

संवेदनशीलता लोपली

विचारांवर आले काजळ…

 

आठवणीत आठवायचा

एक काळ होता असा

कुणाचाच कुणावर

उरला नाही भरवसा….!!

 

°〰️〰️〰️〰️〰️〰️〰️.°

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा