*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*सावळे ते ध्यान ….*
आकाशात आषाढाचे मेघ दाटून आले कि आपोआपच मनात टाळ म्रुदूंग वाजायला लागतात. कानावर कूठून दुरून विणा चिपळ्या ऐकायला येतायत असा भास होऊ लागतो व चित्त वारीच्या मागे धाऊ लागते.
आपल्या थोर संतावर विश्वास, अगम्य अशी भक्ती विठ्ठलाच्या चरणी जायची प्रचंड ओढ असणारे ते वारकरी. त्यांची शिस्त, सुंदर नाच खेळ वारीतल्या परंपरा सुंदर टाळम्रुदूंगाचा नाद व सतत पांडुरंगाचा धावा हे सगळं मिळुन होणारे रसायन म्हणजे. वारकरी. हजारोंच्या संख्येने पाऊले पंढरीची वाट चालत असतात खाणे पिणे झोप याची गरज म्हणुनच विचार एरवी पांडूरंगमय जिवन ..।।
पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न असे. तोंडाने पांडुरंगाला आळवत असे निष्काम निरपेक्ष भक्ती दिवसरात्र चालू असे विठ्ठल रखमाबाई त्याच्या भक्ती ने.भाराऊन. गेले व एक दिवस त्याला भेटायला आले.प्रत्यक्ष भगवंत भेटीचा सोहळा पण पुंडलिकाची मायपित्याची सेवा चालू होती। त्याने देवासाठी एक विट बाहेर फेंकली,आणि देवा इथेच थांबा अशी विनवणी केली. भक्ती चा भुकेला देव तो थांबला बिचारा तिथेच विटेवर ऊभा, कटीवर हात ठेऊनिया.
हेच ते पुंडलिक पूर पूढे भक्ताचे माहेर… हक्काचे मायबापाचे घर झाले आता ते पंढरपूर ओळखले जाते.
रखमाबाई ने पंढरपूर सोडून चला असे खूप दा विनवूनही पंढरीनाथ पंढरपूर सोडून गेले नाहीत संत नामदेव, तुकाराम, जनाई, गोरोबा, सावता माळी अगदी ज्ञानेश्वर, मुक्ताई हे सगळेच थोर संत व पांडुरंग त्यांचा आत्माच. सतत ते भक्ती त दंग असत बेभान होत. जग संसार घरदार विसरून जात असा तो पांडुरंग त्यांच्या भक्तीतून ऊतराई होण्यासाठी त्यांची कामे करत असे.
जनाई गोवर्या थापे, दळण कांडण करे पण देवाच्या भक्ती त काम विसरे मग देवच तिचे काम करून टाकी.असा भक्तांसाठी कनवाळू दयाळू देव पांडुरंग. पिठ, शेण कपड्यांवर अंगावर ऊडे ,तेच गोरोबा मडकी करता करता चिखल ऊडे, तेल्यातांबोळ्याचे तेल देवाच्या अंगावर ऊडे ,सावता माळ्याच्या शेतात माती चिखल ऊडे पण देव सगळ्यांच्या कामात मदत करे व त्याचे भक्त भक्ती त दंग होत भान विसरत याच दयाळू भगवंताने कबीराचे शेले कापडे विणुन दिली.
मुळचा राजस सुकूमार देव या कष्टांमुळे सावळा मळलेला होऊ लागला। त्या तच भक्त मीराबाईचे विषही प्यायल्याने तो नीळसर घननीळ झाला आणि विठ्ठल सावळा झाला. मही, तेलंगण कर्नाटक इथला लाडका पांडुरंग भक्तांचा सखा झाला.
हा कानडा राजा,सावळा विठ्ठल भक्तांना सांभाळून घेतो रक्षण करतो म्हणुन वर्षातुन एकदा या मायबापाला भेटायला हे त्याचे भक्त माहेरी म्हणजे पंढरपूरला धावत येतात. मैलोंमैल चालत, खेळत नाचत देवांचे स्मरण करत गाणी गात येतातच तेही देव चारमहिने झोपी जातात त्या आधी आषाढी एकादशी ला पंढरपूरला पोंचतात. चंद्रभागेत स्नान करून पांडुरंग चरणी नतमस्तक होतात.
पांडुरंगाचे अश्रू भरल्या डोळ्यांनी दर्शन घेऊन त्रुप्त होतात. हीच ती वारी पुन्हा संसाराच्या वाटेला लागतात ते परत पुढचा वर्षी येण्याची वाट बघतच.