You are currently viewing घरघरम्हां आनंद….

घरघरम्हां आनंद….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास उंचीच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ.सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*घरघरम्हां आनंद….*

 

उना दिवाईना सन घरघरम्हां आनंद

पक्का व्हतसं नाताना घट्ट नातानासंबंध…

हासीखुशी येतीजाती चार दिन त्या सुखना

जो तो पेलसं हो वझं कोन कोनले पुरना…

 

तोंडभरी हासीलेवो येरायेरले दखी लेवो

मंग रोजना जोजार.. सांगा कोनले सुटनां..

बहिनी येतीस जातीस चार दिन त्या ऱ्हातीस

सुखदु:ख चावयीन लागीजातीस त्या जोजारम्हां….

 

भासा डिकरा येतसं घर कितलं हाससं

गुईना लाडू नि सांजऱ्या बोकाना भरतंसं..

नऊवारीनी बहिन कशी लक्षुमी दिससं

ती येताज घर हो जसं हासाले लागसं…

 

मायबापले कौतिक देखी देखी पोटभरे

पुढला साले काय व्हयी नहीं माहित गुपित..

ओवायनी टाके भाऊ बहिन म्हनसं राहू दे

तुना संसार देखीनी भाऊ ऱ्हास मी निचित ..

 

माय नि ती शिदोरी मंग बहिन संगे लई जास

तोंडम्हां टाकता टाकता माय समोर दिससं..

दिन दिन याद करो आठवनी दाटतीस

गई दिवाई व माय आते आखाजी दिससं…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा