You are currently viewing मग अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे

मग अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे

मग अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे

आ. नितेश राणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सुचक विधान

*संशयाचा काटा फिरवायचाच असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेल

*मी विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही ; माझी निवडणूक कणकवलीची जनता लढते आहे

कणकवली ;
अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना मी उमेदवारी अर्ज भरायला लावला असे कोण म्हणत असेल तर संदेश पारकर यांना ही त्या चौकटीत बसवायला पाहिजे. नितेश राणे यांनी कोणा कोणाला अर्ज भरायला लावला आहे असा संशयाचा काटा फिरवायचा असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेल.त्यामुळे माझ्या प्रतिस्पर्धी लोकांनी या विषयावर कमीच बोलावे. नाहीतर कुंडल्या बाहेर निघाल्या म्हणजे त्या त्या पक्षाचे प्रमुख त्या लोकांना जागेवर ठेवणार नाही. असा सूचक इशारा भाजप महायुतीचे कणकवली चे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी दिला.
आ. नितेश राणे म्हणाले , मी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूका लढवलेल्या आहेत. मी कधीही माझ्या विरोधकांना कमी लेखत नाही. किंबहुना त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका टिपणी करत नाही. आणि जे उत्तर तुम्हाला द्यायच आहे. ते माझे मतदार 23 तारीखला मत पेटीत दिसेल. निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे.ज्या काही निवडणूक आयोगाच्या अपेक्षा असतात.जे काही नियम दिलेले आहेत. त्या नियमानुसार आम्ही लढतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपल्या सर्वांचा विश्वास असल्यामुळे आम्ही ही निवडणूक संविधानाचे अंतर्गत आणि त्याचा मान ठेवून सर्वजण लढतो आहोत. माझी ही निवडणूक माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी ची जनता लढते आहे. तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझे मतदार तुम्हाला 23 तारखेला देतील , कारण प्रत्येकाच्या घरातला सदस्य म्हणून मी गेली दहा वर्ष वावरलेलो आहे. त्यामुळे माझ्या विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही .
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, दिलीप तळेकर,बाळा जठार , शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा