You are currently viewing वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश…!

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश…!

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश…!

मालवण

दिवाळी सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी कट्टा परिसरातील ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय तसेच सेतू सुविधा केंद्र या सार्वजनिक ठिकाणी पर्यावरण पूरक साहित्या पासून बनवलेले आकाश कंदील व स्वच्छता प्रतिज्ञा हस्तलिखित करून त्याचे वाटप केले.

नागरिकांमध्ये ग्रामस्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, व गाव स्वच्छ सुंदर व्हावा यासाठी या आकाश कंदीलांवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर प्लास्टिक पासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, आपले घर परिसर स्वच्छ राहावा. गाव हागणदारी मुक्त व्हावे या करीता स्वच्छतेची प्रतिज्ञा ही घेण्यात आली.
हे आकाश कंदील बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुठ्ठा रंगीत कागद, इत्यादी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला. या उपक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे मुख्याध्यापक, सौ देवयानी गावडे, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीं कौतुक केले तर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल शिवानंद वराडकर, ऍड. एस एस पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर , सचिव- सुनिल नाईक ,विजयश्री देसाई, सहसचिव -साबाजी गावडे, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर , सर्व संचालक, शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर, यांनी विद्यार्थ्यांचे , अभिनंदन केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा