*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आली दिवाळी*
नववर्ष येती घरा
आनंद होई मनाला,
काय करु कसे करु
गोंधळ क्षणाक्षणाला..।
बनवावे लागतील
गोडधोड खावयास,
सुरुवात होते आता
पाहुणे ही यावयास..।
फटाक्यांच्या आवाजाने
सर्वत्र गजबजले,
नवे कपडे घालून
सर्वच सजधजले..।
फराळांची रेलचेल
करतात धावपळ,
हे आणा ते हवे अशी
सारी कशी पळापळ..।
सण मोठा असे खास
सज्ज त्याच्या आगत्याला,
जग सारे उभे राहे
दिवाळीच्या स्वागताला..।
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*