*⛳भ्रमंती देवगड किल्ल्याची⛳*
देवगड नाव ऐकलं की आपल्याला आठवतो तो देवगड हापूस आंबा 🥭😋 परंतु देवगडचे नाव ज्याच्यावरून पडले असा उपेक्षित जलदुर्ग म्हणजे देवगडला किल्ला. तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असा हा किल्ला!
देवगड या प्रसिद्ध बंदराच्या संरक्षणासाठी तसेच विजयदुर्गला रसद पुरवणे व समुद्रातील व्यापारी गलबतांवर वचक ठेवण्यासाठी देवगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी देवगड ला एम ए एज्युकेशनच्या सत्राला गेलेलो होतो त्या दिवशीच देवगड किल्ला बघायचा असे ठरवलेले होते. त्याप्रमाणे सत्र संपल्यावर किल्याकडे निघालो.
देवगड सुमारे १२० एकर विस्तार असलेल्या किल्याकडे जाण्यासाठी देवगड बंदराचा मार्ग पकडावा. वाटेत डाव्याबाजूस बुद्धविहार दिसते त्याच्या डाव्या बाजूस देवगड किल्याकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे जावे. एका वळणावर डाव्या बाजूस आपल्याला देवगड बीचचा नयनरम्य नजारा दिसतो येथे काही वेळ थांबून हे दृश्य न्याहळावे. चढाव चढून काहीसे पुढे गेल्यास जामा मशिदीच्या अलीकडे डाव्या बाजूस आपल्याला एक बुरुज दिसतो. हा नुसता बुरुज नसून हा एक गोमुखी दरवाजा आहे. बरीच पडझड झालेली असून आजूबाजूला घरे आहेत. दुर्लक्षित झाल्यामुळे तो सहसा आपल्याला दिसतच नाही. स्थानिकांनाही संवर्धन बाबतीत जागृतीची उणीव जाणवली कारण दरवाज्यातच कचरा टाकलेला आढळला.
जामा मशिदीच्या पुढे डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर २५-३० मिटर अंतरावर आपल्याला एक बुरुज आढळतो. याबुरुजाची २५/३० फूट उंची असावी. वर चढण्यासाठी काहीच व्यवस्था आपल्याला दिसतं नाही. बुरुजावर झाडे उगवलेली आहेत.
मागे येऊन पुन्हा बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना उजव्याबाजूस एका घराशेजारीच एक बुरुज आढळतो. त्यापुढे काही अंतरावर असाच एक बुरुज आपल्याला दिसतो बाजूलाच आंबा बागेचा गडगा असल्याने यावर चढता येऊ शकते. हे तीनही बुरुज स्वतंत्र्य बांधलेले असून यांचा बहुतेक तेहळणी साठी केला जात असावा.
पुन्हा रस्त्यावर येऊन पुढे गेल्यास आपल्याला दिसतो तो बालेकिल्ल्याचा दरवाज्या व दरवाज्याकडून पश्चिमेला दूरवर जाणारी तटबंदी व भोवतालचा खंदक. सुमारे २०० मीटर लांबीची ही तटबंदी आहे. खंदक समुद्राच्या दिशेला खुला आहे त्यामुळे खंदकात पाणी साठवले जात नसावे असे वाटते. या खंदकातील जांभा दगड तटबंदीच्या कामासाठी वापरले असावेत आणि मुख्य पाठरापासून बालेकिल्ला स्वतंत्र करण्यात आला असावा तसेच या खंदकामुळे ताटाची उंची वाढली असल्याने शत्रूला शिडी लावून तटबंदीपार करणे शक्य होणार नाही.
गोमुखी पद्धतीचा बालेकिल्ल्याचा दरवाजा असून दोन्ही बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. उजव्याबाजूच्या बुरुजावर लाईट हाऊसकडे जाणाऱ्या मार्गाची दिशा रंगवलेली आहे हे मला जरा रुचले नाही. 😞 दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला हनुमानाचे मंदिर लागते. त्याचे दर्शन घ्यावे व डाव्याबाजूला असलेल्या पायऱ्यांवरून दरवाज्याच्या बुरुजावर चढावे. या बुरुजावरून आपल्याला संपूर्ण बालेकिल्ला दिसतो. खाली उतरून आपण बाजूलाच असलेल्या गणपती मंदिरात जावे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असला तरी मूर्ती मात्र जुनीच आहे. गणपतीच्या मंदिरात थोडीशी विश्रांती करावी त्यानंतर मंदिरासमोरच असलेल्या चाळ्याचे दर्शन घ्यावे. मागे फिरून तटबंदी वरून पश्चिमकडे चालत जावं मध्येच आपल्याला एक बुरुज लागतो. या बुरुजात तोफांसाठी जागा ठेवलेली आहे. पुढे गेल्यास आपण समुद्राच्या काठी असलेल्या बुरुजाकडे पोहचतो. या बुरुजावरून खाली उतरण्यास पायऱ्या आहेत. खाली उतरून पुन्हा पूर्वेकडे चालत गेल्यास आपल्याला एक पाण्याची टाक लागते आत म्हैशी वावरत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. तटबंदीच्या लगत एका इमारतीची जोती दिसते. जरा पुढे गेल्यावर आपल्याला एक उध्वस्त साधारण आयताकृती इमारत लागते. जवळच नवीन स्टेजचे बांधकाम करण्यात आलेले आहे.
पुन्हा मंदिराकडे येऊन उत्तरेकडे असलेल्या लाईट हाऊसकडे जावे. आत प्रवेश फी २० रुपये आहे. माझं लक्ष गडभ्रमंतीकडे असल्याने मी लाईट हाऊसच्या उत्तरेला असलेल्या बुरुजाकडे आलो. तिथून पूर्वेला तटबंदीवरून चालताना खाली जाणारा मार्ग भेटला तिथून खाली तटबंदीच्या कडेने चालत गेलो परंतु खाली नंतर मार्ग संपला पुन्हा मागे येऊन खाली चालत गेल्यावर एका बुरुजाचा आत लाईट हाऊसची सीमा संपते तिथे एक गेट बांधून त्याला टाळ ठोकलेले आहे. मागे फिरून पुन्हा मुख्य दरवाज्याकडे आलो.
मुख्य दरवाज्याकडून पूर्वेला एक रस्ता जातो. पायी चालत गेल्यास आपण सागरी सुरक्षा शाखेकडे पोहचतो. परंतु मी बाईकनेच पुन्हा मुख्य रस्त्याकडे पोहचलो. डाव्या रस्त्याने बंदराकडे जाण्यास निघालो थोडं पुढे गेल्यावर एका घराच्या उजव्याबाजूस समुद्राच्या शेजारीच एक छोटा बुरुज लागतो त्यावर चढायला पायऱ्या आहेत. पुढे गेल्यावर सागरी सुरक्षा कार्यालयाच्या इमारतीच्या सुरुवातीला एक दरवाजा लागतो. सहज हा दरवाजा दिसतचं नाही. पायऱ्यांनी खाली उतरून उजव्या बाजूस दरवाज्या आहे. सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला दरवाज्याचा अंदाज लगेच येत नाही. अजूनही हा दरवाजा सुस्थितीत आहे. वर येऊन पुढे गेल्यास उजव्या बाजूस एक बुरुज लागतो यावर तोफ ठेवलेली आहे. त्याला लागून आपण बंदर जेटीकडे उतरतो. मागे येऊन थोडं पुढे गेल्यावर अजून एक बुरुज व समुद्राकडे रोखून ठेवलेली तोफ आपणास दिसते. अजून थोडं पुढे गेल्यावर अजून दोन बुरुज लागतात. शेवटच्या बुरुजावर सागरी सुरक्षा शाखेचे कार्यालय बांधलेले आहे.
या कार्यालयाच्या पश्चिमेला तटबंदीमध्ये सुमारे ७५-८० पायऱ्या आहेत त्या चढत असताना मध्येच एक बुरुज लागतो. तोफांसाठी याठिकाणी जागा ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये जागोजागी जंग्या आहेत. अजून वर पोहचल्यावर आपण लाईट हाऊसच्या बंद गेटकडील दरवाज्याकडे पोहचतो. येथे एक बुरुज आहे. येथे आपली गडाची संपूर्ण फेरी पूर्ण होते. पूर्वी बालेकिल्यात जाण्यासाठी हा पायरी मार्ग असावा.
देवगड किल्ला भ्रमंतीचेच लिखाण खूप झाल्याने या किल्याचा थोडक्यात इतिहास लिहीत नाही. युट्युब व्हिडीओवरून आपण हा किल्ला पहायला गेलो तर तुम्ही फक्त बालेकिल्लाच बघून याल.😁 दोन पुस्तकांचा संदर्भ वाचून मला किल्ला कसा फिरू समजतच नव्हते त्यात युट्युब व्हिडीओ गोंधळ घालत होते. मग गणपती मंदिरात पुन्हा वाचायला काढलेले पुस्तकही बंद केले आणि फिरत बसलो 😁 त्यामुळे एवढं तरी बघता आलं.
काल घरी आल्यानंतर पुन्हा दोनदा सतिश अक्कलकोट यांचे पुस्तक वाचलं, युट्युब वरील व्हिडीओ बघितले तरी पुन्हा कन्फ्यूज झालो. शेवटी आज सकाळी संदिप तापकीरांचे कुडाळ येथील पुस्तकं वाचून आता हे वर्णन लिहिले. तरीसुद्धा अक्कलकोट यांच्या पुस्तकात एकूण चार दरवाज्यांचा उल्लेख आहे. मला तर तीनच सापडले म्हणजे दत्त मंदिर नजीकचा दरवाजा बघायचा राहिला.🙆🏻♂️ आज माझे मित्र नारायण चव्हाण यांना या दरवाजा बाबत विचारले असता माहिती काढून सांगतो असे बोलले. म्हणजे पुढच्या भ्रमंतीच्या वेळेला अजून एक ठिकाण पाहावयाचे आहे. 😁 एकंदरीत तीन ते साडेतीन तासांची ही भ्रमंती झाली. सोबत कोणी नव्हते त्यामुळे वेळेचे आणि जेवणाचे भानच राहिले नाही.
देवगड ला जाणाऱ्या सर्वांनी एकदातरी हा किल्ला पाहावा असाच आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांनाही हा किल्ला दाखवा. या गडभ्रमंती लेखातून तुम्हाला यापेक्षा वेगळी नवीन माहिती माहिती असल्यास नक्की कळवा 🙏🏻😊 चांगला वाईट प्रतिसादही कळवा 😊
(वेळ देऊन एवढा मोठा msg वाचल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🏻😊)
जय शिवराय 🚩🚩
*🚩गणेश नाईक🚩*
📱९८६०२५२८२५
🚩दुर्ग मावळा परिवार 🚩
______________________________
*संवाद मीडिया*
🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🎊✨ ️साजरे करूया दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊
*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/151709/
*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*
● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️
● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖
● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*
*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/151709/
https://sanwadmedia.com/151635/
https://sanwadmedia.com/150354/
https://sanwadmedia.com/150351/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*