स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रामध्ये जर कोणी मांडत असेल नितेश राणे
*शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे गौरवउद्गार
कणकवलीत आम.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
कणकवली
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान हा बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि मराठी मनात भरवला. आज त्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करत आहे. आज भारताच्या प्रगतीचा विचार नरेंद्र मोदी करत आहेत. मोदी यांच्या स्वप्नातला बलवान भारत हा तुम्हाला सर्वांना बनवायचा आहे. महायुतीने अडीच वर्षांमध्ये जे काम केले ते महाविकास आघाडीला जमले नाही. हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार महाराष्ट्रामध्ये जर कोणी मांडत असेल तर ते आम.नितेश राणे आहेत.
ना.केसरकर म्हणाले, महाराष्ट्र एक नंबर ला आहे. एक नंबर म्हणजे दुसऱ्या स्थानि असलेल्या पाच राज्यातील गुंतवणूक एकत्र केले तरी त्यांच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते. परंतु महाराष्ट्राचे हेच वैशिष्ट्य नाही तर आज एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देणारे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांच्या अकाउंटला केंद्र शासनाकडून ६ हजार आल्यानंतर त्याच्यामध्ये अधिकचे ६ हजार देणारे राज्य हे महाराष्ट्र आहे. आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देणारे, महाराष्ट्र राज्य आहे. तर आपल्या मातांसाठी तीन गॅस सिलेंडर सुद्धा आपण मोफत देतो. आपले जे युवक आहेत, त्यांना ६८०० आणि दहा हजार रुपये महिन्याला विद्या वेतन देण्यात येते. आज मुलींना शिक्षण हे महाराष्ट्रामध्ये मोफत केलेले आहे. महाराष्ट्राचे मध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाला की एक प्रवक्ता म्हणून नितेश राणे यांनी कामगिरी केलेली आहे. निलेश राणे यांचे एकदा मनापासून कौतुक करतो. कुठलेही पद नसताना आपण ज्या पद्धतीने कुडाळ मतदार संघ बांधला आणि नारायण राणे यांना बहुमत मिळवून दिले. नारायण राणे यांच्या वारसा आपण जपलेला आहे. त्या कोकणच्या लाल मातीवर प्रेम करणाऱ्या एका नेत्याचं नेतृत्व आपण लोकसभेच्या निमित्ताने आबाधित ठेवलेले आहे. असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.