You are currently viewing नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देऊन सिंधुदुर्ग महायुतीचा अभ्यद्य किल्ला आहे दाखवून द्या

नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देऊन सिंधुदुर्ग महायुतीचा अभ्यद्य किल्ला आहे दाखवून द्या

नितेश राणे, निलेश राणे, दीपक केसरकर यांना निवडून देऊन सिंधुदुर्ग महायुतीचा अभ्यद्य किल्ला आहे दाखवून द्या

*सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आवाहन

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा हा महायुतीचा अभ्यद्य किल्ला आहे. हे महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी कणकवली मतदारसंघातून नितेश राणे, कुडाळ मतदार संघातून निलेश राणे, आणि सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर या महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना बहुसंख्य मतांनी विजयी करून विधीमंडळात पाठवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
ना. रविंद्र चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रुपाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात आणायचं आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाचे सरकार गेले दोन अडीच वर्ष ज्या पद्धतीने शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने उभं राहिला आहे. कार्यकर्त्यांनी ही निवडणूक डोक्यावरती घेऊन या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मतदानाच्या 70 टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला कसं होईल हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे.
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल या प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जो आपल्याला आदेश दिलाय तो पाळला पाहिजे. जो महायुतीने तोच आपला उमेदवार आहे. मी डोंबिवली मतदार संघातून निवडणूक लढवत असलो तरीसुद्धा सिंधुदुर्गामध्ये प्रचारासाठी येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा