किरकोळ कारणावरून कुणकेश्वर समुद्रात खलाशाकडून सहकाऱ्याचा खून….
देवगड
किरकोळ कारणावरून खोल समुद्रात झालेल्या वादातून नौकेवर असलेल्या खलाशाने सहकाऱ्याचा खून करत नौकाच पेटवून दिल्याचा प्रकार कुणकेश्वर समुद्रात घडला आहे. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यात नौका पूर्णतः जळून गेल्याने दीड कोटीचे नुकसान झाले आहे. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.