You are currently viewing जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयसिंधुदुर्ग यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

          जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे.जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवालनिवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटेजिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंतराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे,  खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी शिवप्रसाद खोतश्री मेश्राम,  पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले कीया निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून निवडणूक हे एक टीम वर्क आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयसिंधुदुर्ग यांचाही सहभाग महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयसिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. विविध सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मतदार जनजागृतीमध्ये माध्यमांचा सहभाग हा महत्वाचा आहे माध्यमांच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय लोकशाहीच्या बळकटीकरणची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंटइलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल. 

          जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत म्हणाले कीविधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये १९७२ ते २०२९ पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारत्यांना मिळालेली मतेमतदानाशी निगडीत आकडेवारीजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारीविधानसभा मतदार संघाचे सन २०२४ चे निवडणूक निर्णय अधिकारीपोलीस अधिकारीनोडल अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांकएकूण मतदारमतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे.

          या पूर्वपीठिकेच्या निर्मितीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटेउपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोल्हापुर विभागाचे माहिती उपसंचालक सुनिल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पूर्वपीठिकेतील माहिती संकलन व संपादनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील सतीश कोरेरवी देवरेअमित राणेयोगेश वानखेडेउमेश बेहेकरशंकर आडेलकर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा