You are currently viewing गेल्या दहा वर्षात जनतेची हेळसांड विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी सज्ज- निलेश राणे

गेल्या दहा वर्षात जनतेची हेळसांड विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी सज्ज- निलेश राणे

कुडाळ :

 

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी खासदार निलेश यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री राणे म्हणाले महायुतीचा उमेदवार म्हणून आपण आज अर्ज भरला आहे. कणकवली- देवगडचे आमदार नितेश राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही त्यांच्या रॅलीला जाणार आहोत तेथे सभा होणार आहे. त्यामुळे आम्ही सभेला जाणार आहोत. शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाही. आमच्याबरोबर जनता आहे. आम्ही नेहमी सातत्याने त्यांच्या सोबत असतो असे सांगून महायुतीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले. आजपर्यंत आपण लोकसभेचा फॉर्म भरत आलो आता विधानसभेचा फॉर्म भरण्याची संधी मला दिली आहे.

जनता आमच्या सोबत आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला माझे प्राधान्य राहणार असून गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ओसाढ होता. आपल्या भूमीची आपल्या जनतेची जी हेळसांड झाली. विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मी कोणावर टीका करणार नाही. जनतेची सेवा हेच माझे लक्ष राहिल. या मातीने येथील जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले. त्या जनतेची सेवा करायची आहे. जनतेला गृहीत धरणार नसून त्यांच्या आशीर्वादाने मोठे मताधिक्य मिळवण्याच्या प्रयत्न राहणार आहे. कुडाळ मालवण सोबत सिंधुदुर्ग पर्यायाने महाराष्ट्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, सर्व महायुती पदाधिकारी यांचे निलेश राणे यांनी आभार मानले. राजकारणात सक्रिय झाल्यापासूनच माझे काम मायबाप जनतेसमोर स्पष्ट आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुडाळ मालवण मतदार संघातील एकही मत आपण आता वाया जाऊ देणार नाही. आपली भूमी पुन्हा भ्रष्टाचारांच्या हाती जाऊ देणार नाही असे राणे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा