*विशाल परब.. लंबी रेस का घोडा*
*विशाल प्रेमापोटी जमलेली गर्दी नव्या नेतृत्वाची चाहूल*
सावंतवाडी:
विधानसभेच्या लढती दिवसेंदिवस रंगतदार अवस्थेत पोचत असून नामनिर्देशन पत्र दाखल करताना विशाल परब यांच्या प्रेमापोटी झालेली गर्दी पाहता उभरत्या नेतृत्वाची चाहूल लागते. सावंतवाडी विधानसभेसाठी आज भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपा आणि शिवसेना सह इतर पक्षांची असलेली महायुती भेदून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या समोर आव्हान उभे केले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यासाठी देखील सावंतवाडी विधानसभेची जागा राखणे म्हणजे कठीण आव्हान बनले आहे.
मराठी माणूस मोठा झाला की तो उलट सुलट धंदे करूनच मोठा झाला असा समज अनेकांचा होतो परंतु कष्टप्रद आयुष्यातून उभारी घेत आपल्या कर्तबगारीवर उद्योजक बनलेले विशाल हृदयाचे विशाल परब नवनवीन संकल्पना राबवून, गोरगरिबांना मदतीचा हात देऊन, संघर्षातून उभा राहत राजकीय शितिजावर चमचमता तारा म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे काही प्रस्थापित लोकप्रतिनिधी, नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काहींना नवे पक्ष शोधावे लागलेत तर काही भविष्यातील वेगवेगळ्या रणनीती आखण्यात मश्गूल झालेत. सावंतवाडी मतदारसंघात जरी राजकीय परिपक्वता समजून विशाल परब यांच्याकडे कोणी दुर्लक्ष केला तरी त्यांची स्वतःची एक वेगळी रणनीती असते. राजकीय आखाड्याकडे पाहताना एक वेगळा दृष्टिकोन असतो त्यामुळेच संधीचे सोने करत आपल्या पाठीशी जनतेचा गोतावळा आणून शांतपणे आपला उद्देश साध्य करून घेतात.
आज नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्या सोबत आलेला हजारोंचा जनसमुदाय पाहिला असता विशाल परब म्हणजे नव्या राजकीय नेतृत्वाची चाहूल म्हटल्यास वावगे ठरू नये.
राजन तेली हे बाहेरून सावंतवाडीच्या आश्रयाला आलेला उमेदवार म्हणून त्यांना मतदारांनी नाकारले होते. नारायण राणेंनी आशीर्वाद दिल्याने राजन तेली यांनी अनेक पदे उपभोगली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले अगदी मागील दाराने आमदार देखील बनले. पण राणेंची साथ सुटल्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पराभूत व्हावे लागले. त्यामुळे नशीबाची साथ मिळत नसल्याने त्यांची “तळ्यात मळ्यात” वृत्ती सुटली नाही आणि आजच्याघडीला पक्षीय वर्तुळ पूर्ण करून ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले. परंतु विशाल परब यांचे निर्णय स्वतःचे असतात. आपल्या व्यवसायातून उन्नती साधत त्यांनी सावंतवाडी विधानसभेचा आमदार होण्याचे स्वप्न पाहिले. दीपक केसरकर यांच्या कडून पूर्ण न झालेली कामे आपण करणार असा चंग बांधून महायुती असताना देखील बंड करून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण केली. एकीकडे नाम. दीपक केसरकर, राजन तेली असे ओबीसी समाजाचे उमेदवार असताना दुसरीकडे अर्चना परब, विशाल परब हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत. जर सावंतवाडीतील जरांगे पाटील यांच्या समर्थकांसह मराठा समाजाने विशाल परब यांना मदत केली तर नक्कीच त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील.
विशाल परब यांच्याकडून मतदारांनी मोठ्या अपेक्षा बाळगून आज जी गर्दी केली ती पाहिली असता सावंतवाडीत येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकालामध्ये अभूतपूर्व बदल झाल्यास नक्कीच आश्चर्य वाटू नये.
_____________________________
*संवाद मिडिया*
*सण होणार मस्त..किंमती आहेत जबरदस्त*
✨टाटा मोटर्स✨
💥फेस्टिव ऑफ़ कार्स💥
https://sanwadmedia.com/150944/
✅*आपण खरेदी करत असणारे कार मध्ये तुमचे कुटुंब सुरक्षित आहे ना याची माहीती घेणे ही तुमची जबाबदारी आहे.*
✅ देशाच्या हॅचबॅक आणि कॉम्पैक्ट सीडान या श्रेणी मधील ग्लोबल एनकॅप सेफ्टी रेटिंग ने प्रमाणित सर्वात सुरक्षित टाटा कार्स
✅टाटा टियागो – ₹.४.९९ लाख पासुन
✅टाटा टिगोर – ₹.५.९९ लाख पासुन
✅टाटा अल्ट्रोज – ₹.६.४९ लाख पासुन
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✅ॲान द स्पॉट लोन अप्रूवल
✅ ८.३०% इतका कमी व्याज दर
✅एक्सचेंज अन्तर्गत सर्वोत्तम इवैल्यूएशन
✅ऑन रोड फाइनेंस स्कीम्स
✅ विनम्र आणि तत्पर सेवा
✅ सर्व सुविधा युक्त वातानुकुलीत शोरुम
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/150944/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*