कुडाळ :
माजी खासदार मा. निलेश राणे यांनी कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज सोमवारी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व भाजपा शिवसेना, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.