You are currently viewing नवोदितांनी प्रस्थापितांमध्ये घुसलेच पाहिजे – अनिल उदावंत

नवोदितांनी प्रस्थापितांमध्ये घुसलेच पाहिजे – अनिल उदावंत

पुणे :

साहित्याच्या प्रवासात नवोदित आणि प्रस्थापित असा भेद नेहमीच दिसून येतो. प्रस्थापित नवोदितांना सहज आपल्यामध्ये घेत नाहीत. म्हणून नवदितांनी न थांबता प्रस्थापितांमध्ये धाडसाने प्रवेश केला पाहिजे. हे करत असताना अनेक कवींच्या कवितेतील विचार भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो, शब्दांशी घट्ट नाते तयार होते आणि आपल्या साहित्याचा दर्जा सुधारतो. कधी कधी मग ज्येष्ठ साहित्यिकांचा आपल्याला मनापासून पाठबळ मिळते. आणि आपण प्रस्थापित होतो. असे विचार अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ साहित्यिक अनिल उदावंत यांनी व्यक्त केले.

शुभ दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला साहित्य सम्राट पुणे आणि डॉ. समीर बोराटे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने १९४ वे विशेष कवी संमेलनन बोराटे हॉस्पिटलमध्ये फुरसुंगी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

विचारपीठावर कवी संमेलनाचे अध्यक्ष अनिल उदावंत, साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ, रानशिवार गोविंद पाटील , जगदीप वनशिव आणि डॉ.समीर बोराटे प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. मंगेश बोराटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कवी संमेलनामध्ये सासवड, उरुळी कांचन, राजगुरुनगर, चास, कोल्हापूर, पिंपळे निलख, मुंढवा , धनकवडी, रत्नागिरी, हडपसर परिसर इ.अनेक गावच्या पन्नास कवी कवित्रींनी आपल्या हिंदी मराठी कविता आणि गझल सादर करून दवाखान्यातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये डॉक्टर कवी कवयित्रींच्यासह गोविंद पाटील, जगदीप वनशिव, दशरथ दुनघव, विनोद ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे, प्रेम ताम्हाणे, डॉ.आरती अंभोरे, प्रवीण शिंदे, अनिल उदावंत, अनिता उदावंत, डॉ.चंद्रकांत कोळी, डॉ.रसिक झांजे, अलका जोगदंड, पंढरीनाथ रहाणे, रामचंद्र मोरे, विद्या पवार, संदीप झगडे, डॉ. बळीराम ओव्हाळ, डॉ.सचिन नागापूरकर, श्रीकांत वाघ, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामूगडे, गणेश गायकवाड, सारा बत्तीसे, संजीवनी जगताप, अश्विनी जगताप, उषा गायकवाड, प्रियंका तारू, शारदा शिपलकर, प्रवीण वानखडे, प्रा. आनंद महाजन, संदिपान पवार, डॉ.मनोज लडकत, संदीप झगडे, डॉ. प्रतीक राऊत, प्रल्हाद शिंदे, दत्तात्रय कुलकर्णी, अंकुश जगताप, प्रल्हाद भालेराव, डॉ. मंगेश बोराटे आणि गणेशगायकवाड इत्यादी कवी कवयित्री यांनी आई, माय, मासाहेब, प्रेम, बायको, बाप, कोरोना, शिवाजी, स्वातंत्र्य, शेरोशायरी ,चारोळी कविता, हिंदी मराठी गझल, विनोदी काव्य, लावणी अशा विविध विषयांवर नाविन्यपूर्ण आशयघन काव्यरचना सादर केल्या. अनेकांनी दवाखान्यात सजलेल्या अनोख्या कवी संमेलनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मंगेश बोराटे यांनी तसेच बहारदार सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी तर सर्व कवी कवयित्री आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे आभार विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा