You are currently viewing मंगेश तळवणेकर परत एकदा मुक्या जनावरांच्या मदतीला…

मंगेश तळवणेकर परत एकदा मुक्या जनावरांच्या मदतीला…

सावंतवाडी

तालुक्यात मळगाव गावात एक विशिष्ट प्रकारचा आजार जनावरांमध्ये आढळून आला आहे. याचा फटका मळगाव येथील एका गायीला बसला. यासंबंधीची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष  मंगेश तळवणेकर यांना कळताच ते डॉक्टरांची टीम घेत घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित गायींवर उपचार सुरू केले. आजही अशीच मोहीम राबवली जाणार आहे. अशी माहिती तळवणेकर यांनी दिली. उपचार करताना डॉ. सुरेश राठोड(पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ आरोंदा, अतिरिक्त चार्ज पशुवैद्यकीय दवाखाना सातार्डे), डॉ. सुधाकर ठाकूर(पशुधन विकास अधिकारी पं.स.सावंतवाडी) , डॉ. विद्यानंद देसाई (पशुधन विकास अधिकारी) यांची मोलाची साथ लाभली. व संबंधित गायीवर उपचार केले. मळगाव हे कार्यक्षेत्र पशुधन विकास अधिकारी डॉ. जाधव यांचे असताना ते या गायीपर्यंत अद्याप पोहोचलेच नाहीत. दोन दिवसांपूर्वी आपल्या कार्यात दिरंगाई करणाऱ्या या पशुधन अधिकाऱ्यांविरुद्ध श्री तळवणेकर यांनी तक्रार केली होती. मात्र तरीही डॉ.जाधव यांनी आपल्या भूमिकेत कोणताही बदल केला नसल्याने दिसून येते. गावपातळीवर पशुअधिकाऱ्यांनी आपले व आपल्या वरिष्ठांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे आवाहन श्री तळवणेकर यांनी केले आहे. कारण त्यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होऊ शकतील. सध्या या आजारावर जि.प.मार्फत मोफत लस उपलब्ध करून दिली गेली.मात्र या लसीचा तुटवडा भासल्यास विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने मोफत लस उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही संघटनेचे श्री तळवणेकर, लक्ष्मण शिवराम देऊलकर(आरोस), संतोष हरमलकर, इ.नी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 2 =