You are currently viewing शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी संजय आग्रे यांची नियुक्ती

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी संजय आग्रे यांची नियुक्ती

कणकवली :

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना बढती देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले आहे.शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले संजय आग्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ त्यांनी जिल्हा प्रमुख पदी यशस्वीरित्या काम केले. दरम्यान भाजपामधून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या दत्ता सामंत यांना कुडाळ मालवण सहित कणकवली विधानसभेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. ही नियुक्ती देतानाच संजय आग्रे यांना बढती देत त्यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पत्र त्यांना देण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नियुक्त पत्र देत अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा