You are currently viewing आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक संपन्न.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक संपन्न.

*आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कुडाळ-मालवण पदाधिकारी बैठक संपन्न.*

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कुडाळ-मालवण विधानसभेची बैठक हॉटेल लाईम लाईट कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत राज साहेब यांची युतीत/ आघाडीत सहभागी नसल्याची भुमिका आहे. नेते शिरीष सावंत ,निरिक्षक गजानन राणे, संदीप दळवी यांच्या आदेशानुसार मनसेची जिल्ह्यातील वाटचाल असणार आहे. त्याप्रमाणे सदर बैठकीत दोन्हि तालुक्यातील सर्व विभागीय पक्षीय पदे भरण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, विधानसभा सचिव सचिन सावंत, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, शहराध्यक्ष सागर जाधव,उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष शैलेश हडकर – प्रथमेश धुरी-रोहन ठाकुर, उपविभाग अध्यक्ष संतोष सावंत, अर्जुन अट‌‌‌क,सुरज पुजारे, सुशांत परब,अविनाश अणावकर,बंटी नेवगी, जगन्नाथ गावडे, सागर सावंत आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा