*सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सदस्य श्री. आय.वाय. शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती*
कुडाळ
सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये एका निष्ठावान कार्यकर्त्याची प्रतिष्ठित नियुक्ती – वालावल जिल्हा परिषद मतदारसंघातील, गेली ३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. आय.वाय.शेख यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोलेजी यांच्या आदेशानुसार त्यांना हे महत्त्वाचे पद प्रदान करण्यात आले.
युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. विलासजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षासाठी दिलेले योगदान, तसेच कुडाळचे कै. गणपतराव राऊळ यांच्या नेतृत्वात काम करण्याचा अनुभव, त्यांच्या या नियुक्तीला बळकटी देणारा ठरला आहे.
जिल्हाध्यक्ष श्री. इर्शादजी शेख यांच्या नेतृत्वात कार्य करताना, संघटनाच्या मजबुतीसाठी आणि काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी ते जोमाने काम करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांनी संघटना वाढ आणि काँग्रेस बळकट करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे.