*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*“तुम्ही पाठीशी आहात!”*
अक्कलकोट हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मायेचे माहेर आहे.तिथे जाऊन आलं कि, मायेचे माहेर भेटल्याचा आनंद मिळतो.
कारण श्री स्वामी हेच भक्तांचे मायबाप, बंधू भगिनी,सखा या सगळ्या भुमिकेतुन भक्ताला विश्वास देतात…. धीर देतात. जितकी श्रद्धा गाढ तितकी अनुभूती लवकल मिळते.
श्री. स्वामींची अपेक्षा काही नाही.
फक्त नामसस्मरण,अनन्नदान सदाचार आणि भूतदया यांचे पालन करत संसारात रहा. कर्तव्य करत रहा.
श्री स्वामी हे श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार समजले जातात.चराचरात हा देव भरून राहिला आहे.भक्तांची काळजी घेत आला आहे.त्या वटवृक्षाखाली त्यांचा वास आहे.
सृष्टी हेच त्यांचे घर आहे.बघताना थोडी नजर भेदक आहे. तुमच्या काळजाचा….. अंतरंगाचा ती ठाव घेतेय असंच काहीसं वाटतं पण आपल्या अंतरंगातील भक्तीचा सुगंध मिळाला कि तीच नजर अंत:करणातील प्रेम करूणा,कृपा यांच्या सागराचे दर्शन घडवते.
दत्त भक्ती करता आपोआप श्री स्वामींची ओढ लागायला सुरवात होते. दत्त गुरु आणि स्वामी एकच गुरूतत्व निधान आहे ही अनुभूती मिळते. मग मन अक्कलकोटला दिशेने ओढ घेऊ लागते. कधी श्री स्वामींचे दर्शन होईल?…. कधी ते आपल्याला ऊराशी कवटाळतील? असे मन त्यांच्यासाठी व्याकुळ होते.
एकदा का दर्शनाची अनुभूती मिळाली कि मग मायलेकराचे नाते सहजच जुळते. ते आपल्या पाठीशी आहेतच हा विश्वास मिळत रहातो.
डोळ्यासमोर स्वामींचे शांत स्वरूप सदैव ऊभे रहाते.
मग जे जे दिसते तिथे तिथे त्यांचीच अनुभूती मिळते.
जिवनात कधी काटे …. कधी सर्वांची माया आटते… धक्के बसतात… वाट अडवली जाते… काही घटना मन दु:खी करतात… हे सगळी आपल्याच दुष्कृत्याची फळं असतात… हा नियतीचा खेळ मानला जातो…. अशावेळी फक्त श्री स्वामी नाम जप श्रद्धेने करत रहायचं .बाकी सारे त्यांच्यावर… आपल्या आईवर सोडुन द्यायचे. आई मुलाचे वाईट चिंतित नाही तसेच श्री स्वामी आपल्या लेकरासाठी काळाशी झगडतात.. नियतीला दूर सारतात व लेकराचा मार्ग परत सुकर करतात.
आपण स्वामी नाम जपासह आयुष्यात त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून पुढेच जायच आहे. सोबत त्यांची नक्कीच असते ही दृढ श्रद्धा मनात पक्की ठेवायची.
संसाराच्या चक्रात जर आपला अभिमन्यू होऊ नये असं वाटत असेल तर जमेल तसं श्री स्वामी नाम जपाची संगत करा.
श्रीस्वामी नाम जप हे एका शिव धनुष्याप्रमाणे आहे.
खर्या श्रद्धेचा भक्तच हे ऊचलू शकतो.
फार कठीण आहे . मन ताब्यात ठेवणे…. त्यांच्या चरणाशी लीन होणे.
ध्यानात तल्लीन होणे… पण त्यांच्या नामजपाचे अस्त्र हातात असले कि कोणतेही कठीण काम सहजच पार पडते.
नामजपाविण परमार्थ कसा साधेल हो?
जगण्याचा अर्थ तरी समजेल का?त्यांचे नामस्मरणच आधार देईल जिवनास आकार देईल.
अमावस्येच्या अंधाराची भिती घालवेल.निष्ठा, कर्तव्य श्रद्धा,भक्ती सदाचार सद् भाव ह्या सह संसारचक्रात स्थिर व्हायचे ज्ञान ते देतात.
या जगात स्थिर तर काहीच नाही म्हणुन नामजपाशी साथसंगत करून स्थिर व्हायचे.
कितीही आपण चुकलो तरी ते आपले अपराध आईप्रमाणे पोटात घालतात.दयेचा कृपासिंधूच आहेत श्री स्वामी!
वय वाढते आयुष्य कमी होते . यासाठी आहे ते क्षण नामजपात घालवायचे. स्वामी चरणी भाव ठेवायचा.
जगणं सुद्धा स्वामींसाठी आणि मरण सुद्धा स्वामींचरणी.
श्री स्वामींच्या सावलीत हा आयुष्याचा सोपान भक्त सहज चढुन जातो.
भक्त पाही नामामद्धे त्याचा देव … देवास आवडे भक्ती भाव.
गायली स्वामी गाथा..
टेकवी त्यांच्या चरणी माथा.
अनुराधा जोशी
अंधेरी मुंबई ६९
9820023605