You are currently viewing विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार देण्याचा एकमताने निर्णय

विधानसभा निवडणूकीत शेतकरी संघटनेचा उमेदवार देण्याचा एकमताने निर्णय

सावंतवाडी:

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर २०२४ रोजी बांदा येथे बांदा विविध कार्यकारी संस्थेच्या सभागृहात शेतकरी संघटनेचा उमेदवार उभा करण्याविषयी एकत्रित अंतिम निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठकित शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच योग्य उमेदवाराची निवड, निवडणूक प्रक्रिया, व्यूहरचना करण्यासाठी उपस्थितांमधून कोअर कमिटी निर्गठीत करण्यात आली. शेतकरी संघटनेचा उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा २७ ऑक्टोबर २०२४ रोजी करून २८ ऑक्टोबर २०२४ रोजी शेतकरी संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

बैठकीची प्रस्थावना श्री. सुरेश गावडे यांनी, प्रस्थावित अध्यक्षीय मनोगत श्री. विलास सावंत, हेतू मार्गदर्शनपर आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेंगुर्ला नगर परिषदचे माजी सभापती श्री. जयप्रकाश चमणकर तर आभार प्रदर्शन श्री. संजय देसाई यांनी केले.

या बैठकीत सिंधुदुर्ग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत, सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री. दिवाकर म्हावंळणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि रोनापाल माजी सरपंच श्री. सुरेश गावडे, उद्योजक आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रवीण परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष श्री. संजय देसाई, सचिव अशोक सावंत, खजिनदार श्री. आकाश नारसुले, प्रगत शेतकरी श्री. प्रणव नाडकर्णी, प्रगत उद्योजक श्री. नारायण गावडे आणि चंद्रशेखर देसाई, श्री. जयप्रकाश चमणकर, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना अध्यक्ष श्री. राजेंद्र अंदुर्लकर, सचिव श्री.हनुमंत गवंडी , सदस्य श्री. भानुदास गवंडी, श्री. शेखर नाईक, श्री. शरद आरोसकर,वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्री. संजय लाड, श्री. रत्नदीप धुरी, प्रगत आंबा काजु बागायतदार संघटना आणि संशोधक श्री. विलास ठाकूर, यशस्वी सरपंच श्री.प्रकाश गाडेकर, जिल्हा नर्सरी संघटना श्री. शिवराम आरोलकर, कामगार ठेकेदार श्री. समीर सावंत, प्रगत उद्योजक श्री. सुहास सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर परब, लाकूड व्यापारी संघटना सदस्य श्री. शिवाजी गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा